February 20, 2026

जवळा खुर्द येथील छत्रपती संभाजी विद्यालयात शिवजयंती उत्साहात

  • कळंब – छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जवळा खुर्द येथील छत्रपती संभाजी विद्यालय जवळा खुर्द येथे उत्साहपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
    ज्ञान प्रसारक मंडळ,येरमाळाचे सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने व मुख्याध्यापक संभाजी गिड्डे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवजयंती साजरी करण्यात आली.
    प्रारंभी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्रीकांत पवार यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
    शिवजयंतीनिमित्त शाळेत भाषण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराजांच्या शौर्य,स्वराज्य संकल्पना आणि लोककल्याणकारी कार्यावर प्रभावी भाषणे सादर केली. स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरणही करण्यात आले.
    यावेळी मुख्याध्यापक संभाजी गिड्डे,धनंजय डोळस,सूर्यकांत लोहार,अशोक सावंत,श्रीकांत तांबारे,उस्मान शेख,ओमकार डिकले आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सूर्यकांत लोहार यांनी केले.
    अशा प्रकारे छत्रपती संभाजी विद्यालयात शिवजयंती प्रेरणादायी वातावरणात उत्साहात साजरी करण्यात आली.
error: Content is protected !!