कळंब – छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विद्या भवन हायस्कूल कळंब येथे दि.१९ फेब्रुवारी २०२६ रोजी उत्साहपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. ज्ञान प्रसारक मंडळ,येरमाळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने व मुख्याध्यापक व्यंकट कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला. प्रारंभी शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस मुख्याध्यापक व्यंकट कुंभार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. तसेच विद्यालयात संस्थापक अध्यक्ष कै.ज्ञानदेव मोहेकर गुरुजी (अण्णा) यांच्या प्रतिमेलाही पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी मुख्याध्यापक,शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्य,स्वाभिमान व लोककल्याणकारी कार्याची आठवण करून देत कार्यक्रम प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला.
More Stories
“आरक्षणावर उपवर्गीकरणाचा घाव चालणार नाही” कळंबमध्ये ४ मे रोजी भव्य मोर्चाची हाक
भोसा गावातील विद्यार्थ्यांची एस.टी.बससाठी हाक; शिक्षणासाठी प्रवासाचा मोठा प्रश्न ऐरणीवर
समता,शिक्षण आणि न्यायाचा दीप प्रज्वलित – मोहेकर महाविद्यालयात महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्साहात साजरी