परांडा – शिक्षण महर्षी गुरुवर्य रा. गे. शिंदे महाविद्यालय परंडा येथे दि.१९ फेब्रुवारी २०२६ वार गुरुवार रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.हा कार्यक्रम श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ धाराशिव संचलित महाविद्यालयात प्राचार्य डॉ. सुनील जाधव यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रशासकीय अधिकारी भाऊसाहेब दिवाने, मराठी विभाग प्रमुख डॉ.गजेंद्र रंदील,वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. अरुण खर्डे तसेच कार्यालयीन अधीक्षक श्रीमती पद्मा शिंदे यांच्या हस्ते शिवाजी महाराज व संस्थेचे अध्यक्ष कै.रा.गे.शिंदे गुरुजी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी सांस्कृतिक विभाग प्रमुख तथा स्टाफ सेक्रेटरी डॉ.शहाजी चंदनशिवे यांनी मार्गदर्शन करताना शिवाजी महाराजांच्या शौर्य,दूरदृष्टी आणि लोककल्याणकारी प्रशासनाची माहिती दिली.त्यांनी विद्यार्थ्यांनी शिवरायांचे विचार आचरणात आणून राष्ट्रनिष्ठा,शिस्त आणि सामाजिक बांधिलकी जोपासावी, असे आवाहन केले. कार्यक्रमास उपप्राचार्य डॉ.महेश कुमार माने,विविध विभागांचे प्रमुख,प्राध्यापक,सहशिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अशा प्रकारे रा.गे.शिंदे महाविद्यालयात शिवजयंती उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात साजरी करण्यात आली.
More Stories
जनसेवेची परंपरा कायम; नगरसेवक रत्नकांत ‘पापा’ शिंदे यांचा प्राध्यापकांकडून सत्कार
परंडा येथे ‘सोहळा दिव्यांगांचा,सोहळा सन्मानाचा’कार्यक्रम शेकडो दिव्यांगांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न
शिक्षण हाच मुक्तीचा मार्ग आहे हे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजाला शिकवले – प्राचार्य डॉ.सुनील जाधव