कळंब–कळंब तालुक्यातील जवळा खुर्द येथील छत्रपती संभाजी विद्यालयात इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न झाला. ज्ञान प्रसारक मंडळ,येरमाळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने व मुख्याध्यापक संभाजी गिड्डे यांच्या मार्गदर्शनाखाली दि.१४ फेब्रुवारी २०२५ रोजी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्यांमध्ये प्राचार्य जगदीश गवळी,शालेय व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष गजेंद्र समुद्रे,ग्रामपंचायत सदस्य बालाजी पवार,जिल्हा परिषद शाळा एकुरक्याचे सहशिक्षक निनाळ व अच्युतराव करडे यांची उपस्थिती लाभली. प्रारंभी संस्थापक अध्यक्ष शिक्षण महर्षी कै.ज्ञानदेव मोहेकर गुरुजी तसेच राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना प्राचार्य जगदीश गवळी यांनी विद्यार्थ्यांनी आधुनिकतेची कास धरून नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करावे,असे आवाहन केले. तसेच छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना डोक्यावर न घेता डोक्यात घ्यावे,म्हणजेच त्यांच्या विचारांचे अनुकरण करावे,असा संदेश त्यांनी दिला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मुख्याध्यापक संभाजी गिड्डे यांनी भूषविले.स्वयंशासन दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी शाळेचे कामकाज पाहिले.यामध्ये मुख्याध्यापक म्हणून निकेश धावारे,उपमुख्याध्यापिका अक्षरा समुद्रे, पर्यवेक्षक संस्कृती करडे व शिक्षणाधिकारी म्हणून सय्यद शेख यांनी जबाबदाऱ्या सांभाळल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहशिक्षक अशोक सावंत यांनी तर प्रास्ताविक सहशिक्षक धनंजय डोळस यांनी केले. विद्यार्थ्यांनी शाळेविषयी आपल्या भावना व ऋण व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सूर्यकांत लोहार,पृथ्वीराज लोमटे व ओम डिकले यांनी परिश्रम घेतले.शेवटी आभार प्रदर्शन मराठी विभाग प्रमुख श्रीकांत तांबारे यांनी केले.
More Stories
छत्रपती संभाजी विद्यालयात महाराष्ट्र मुक्तिसंग्राम दिन उत्साहात साजरा
छत्रपती संभाजी विद्यालय,जवळा (खुर्द) येथे डॉ.अशोकराव मोहेकर व डॉ.सूर्यकांत जगदाळे यांची सदिच्छा भेट
छत्रपती संभाजी विद्यालयाचा शंभर टक्के निकाल