February 17, 2026

विद्यार्थीप्रिय गणित विषयाचे शिक्षक शशिकांत मांजरे यांचा वाढदिवस जल्लोषात

  • विद्यामंदिर हायस्कूल,आष्टा येथे शशिकांत मांजरे सरांचा स्नेहसोहळा
  • आष्टा– ज्ञान प्रसारक मंडळ, येरमाळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ. अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने व मुख्याध्यापक आनंद रामटेके यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यामंदिर हायस्कूल,आष्टा ता. भूम जि.धाराशिव येथे विद्यार्थीप्रिय गणित शिक्षक शशिकांत मांजरे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला.
    याप्रसंगी मुख्याध्यापक आनंद रामटेके,सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या लाडक्या गुरुजींचा वाढदिवस निमित्ताने शाळेत आनंददायी वातावरण निर्माण झाले होते.

  • मांजरे सरांच्या वतीने प्रशालेतील विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले.इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी केक कापून आपल्या आवडत्या सरांचा सत्कार केला. विद्यालयाच्या वतीने शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांना अभिष्टचिंतन करण्यात आले.
    शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांशी जिव्हाळ्याचे नाते जपणारे आणि गणित विषय सोप्या पद्धतीने शिकवणारे मांजरे सर यांच्याविषयी विद्यार्थ्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.या स्नेहसोहळ्यामुळे शाळेत आनंद व आपुलकीचे वातावरण निर्माण झाले.
error: Content is protected !!