कळंब – सामाजिक,सांस्कृतिक आणि शिवजयंती निमित्त राबविल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांमुळे कळंब शहरातील शिवसेवा तालीम संघ यांना यंदाचा मानाचा शिवभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.हा पुरस्कार कळंब तालुका पत्रकार संघ यांच्या वतीने दरवर्षी प्रदान केला जातो. गेल्या अनेक वर्षांपासून शिवजयंती उत्सवानिमित्त व्याख्यानमाला,लोककला सादरीकरणे,सांस्कृतिक कार्यक्रम तसेच गरजूंसाठी अन्नदान अशा विविध समाजोपयोगी उपक्रमांचे सातत्याने आयोजन केल्याबद्दल शिवसेवा तालीम संघ,कळंब यांच्या कार्याची दखल घेत हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.संघाच्या माध्यमातून युवकांमध्ये सामाजिक बांधिलकी व राष्ट्रप्रेमाची भावना रुजविण्याचे कार्य उल्लेखनीय ठरले आहे. पुरस्कार वितरण सोहळा मंगळवार,दि.१७ रोजी सायंकाळी ७ वाजता कळंब येथील होळकर चौक येथे आयोजित करण्यात आला आहे.या कार्यक्रमास शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे,असे आवाहन पत्रकार संघाचे अध्यक्ष अशोक शिंदे यांनी केले आहे. या पुरस्कारामुळे शिवसेवा तालीम संघाच्या कार्याला अधिक प्रेरणा मिळणार असून,शहराच्या सामाजिक-सांस्कृतिक चळवळीला नवे बळ मिळेल, अशी भावना व्यक्त होत आहे.
More Stories
अल्प पेन्शनवाढीसाठी EPS-95 सेवानिवृत्तांचा आवाज बुलंद; केंद्रीय श्रम मंत्र्यांना निवेदन
बातमी डिलीट करण्यासाठी पत्रकाराला धमकी;कळंबमध्ये दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
गांधी विचार संस्कार परीक्षेत मोहेकर महाविद्यालयाची उज्ज्वल परंपरा कायम