धाराशिव (जिमाका) – सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य आणि जिल्हाधिकारी कार्यालय, धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त दोन दिवसीय भव्य सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.हे सर्व कार्यक्रम छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह,नगर परिषद,धाराशिव येथे संपन्न होणार आहेत. कार्यक्रमाचे स्वरूप पुढीलप्रमाणे आहे – बुधवार,१८ फेब्रुवारी २०२६ (सायंकाळी ५.०० ते रात्री ८.००): कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित नाट्य आणि विविध सांस्कृतिक आविष्कार सादर करण्यात येणार आहेत.यामध्ये बिहारीलाल राजपूत व राणा जोगिंद यांचा कडाडता ‘शाहिरी कार्यक्रम’ तसेच शुभम खोते यांचा विशेष सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. गुरुवार,१९ फेब्रुवारी २०२६ (सकाळी ११.०० ते दुपारी २.००) शिवजयंतीच्या दिवशी सकाळी शिवशाहीर सुभाष गोरे व बंडू खराडे यांचा प्रेरणादायी शाहिरी कार्यक्रम रंगणार आहे.तसेच अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या वतीने शिवचरित्रावर आधारित विशेष सांस्कृतिक सादरीकरण केले जाणार आहे. हे सर्व कार्यक्रम नागरिकांसाठी पूर्णपणे विनामूल्य असून धाराशिव शहरातील तमाम शिवप्रेमी नागरिक,तरुण आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे,असे आवाहन सांस्कृतिक कार्य विभाग व जिल्हाधिकारी कार्यालय,धाराशिव यांच्या वतीने करण्यात आले आहे.
More Stories
‘माय भारत’ मेगा पदयात्रेतून शिवजयंतीचा जागर
पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या वेदना जाणून सार्वजनिक मालमत्तेच्या नुकसानीची केंद्रीय पथकाकडून पाहणी
ॲड.गुंड,काळे,घोलप,पवार,सुर्यवंशी,सोनवणे यांना पवनराजे स्मृती गौरव पुरस्कार जाहीर