आष्टा – ज्ञान प्रसारक मंडळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने तसेच मुख्याध्यापक आनंद रामटेके यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक १२ फेब्रुवारी २०२६,गुरुवार रोजी विद्यामंदिर हायस्कूल,आष्टा ता.भूम,जि.धाराशिव येथे संस्थापक अध्यक्ष शिक्षण महर्षी कै.ज्ञानदेव मोहेकर गुरुजी (अण्णा) यांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून विधिवत पूजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात गुरुजींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलनाने करण्यात आली.याप्रसंगी मुख्याध्यापक आनंद रामटेके यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून गुरुजींच्या शैक्षणिक कार्यास अभिवादन करण्यात आले.यावेळी बोलताना त्यांनी गुरुजींच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वामुळे ग्रामीण भागात शिक्षणाचा दीप प्रज्वलित झाला असून त्यांचा आदर्श विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी असल्याचे सांगितले. या कार्यक्रमास सहाय्यक वरिष्ठ शिक्षक नामदेव अनंत्रे,शशिकांत मांजरे,संघपाल सोनकांबळे, श्रीमती निर्मला वाघमारे, सुजितकुमार जाधव,बबन यादव आदी मान्यवर उपस्थित होते.तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित राहून गुरुजींना आदरांजली अर्पण केली. कार्यक्रमाच्या शेवटी संस्थापक अध्यक्षांच्या कार्याचा वारसा पुढे नेण्याचा व विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता,शिस्त आणि संस्कार रुजविण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
More Stories
विद्यामंदिर हायस्कूल आष्टा येथे शिक्षण महर्षी कै.ज्ञानदेव मोहेकर गुरुजींच्या प्रतिमेचे पूजन
विद्यामंदिर हायस्कूल आष्टात कै. ज्ञानदेव मोहेकर गुरुजींच्या स्मृतीस अभिवादन
विद्यामंदिर हायस्कूल,आष्टा येथे ७७ वा प्रजासत्ताक दिन देशभक्तीच्या वातावरणात उत्साहात साजरा