February 12, 2026

विद्याभवन हायस्कूल कळंब येथे शिक्षण महर्षी कै.ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना अभिवादन

  • कळंब – ज्ञान प्रसारक मंडळ, येरमाळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने तसेच मुख्याध्यापक व्यंकट कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक १२ फेब्रुवारी २०२६,गुरुवार रोजी विद्याभवन हायस्कूल,कळंब येथे संस्थापक अध्यक्ष कै.ज्ञानदेव मोहेकर गुरुजी (अण्णा) यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विधिवत पूजन करण्यात आले.
    कार्यक्रमाच्या प्रारंभी मुख्याध्यापक व्यंकट कुंभार यांच्या हस्ते गुरुजींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी त्यांनी आपल्या मनोगतात गुरुजींच्या शैक्षणिक,सामाजिक व संस्कारमूल्य जपणाऱ्या कार्याचा गौरव करत विद्यार्थ्यांनी त्यांच्या आदर्शांचा अंगीकार करावा,असे आवाहन केले.
    ग्रामीण भागात शिक्षणाची ज्योत प्रज्वलित करण्यासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाची आठवण यावेळी उपस्थितांनी कृतज्ञतापूर्वक व्यक्त केली.
    या प्रसंगी विद्यालयाचे उपमुख्याध्यापक विक्रम मयाचारी,पर्यवेक्षिका श्रीमती कोळी तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमात शांतता,शिस्त आणि आदरयुक्त वातावरणात गुरुजींना अभिवादन करण्यात आले.
    शेवटी संस्थापक अध्यक्षांच्या कार्याचा वारसा जपत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला.
error: Content is protected !!