आष्टा — दिनांक २२ जानेवारी २०२६,गुरुवार रोजी ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने व विद्यामंदिर हायस्कूल आष्टा येथील मुख्याध्यापक आनंद रामटेके यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थापक अध्यक्ष कै.ज्ञानदेव मोहेकर गुरुजी (अण्णा) यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. यावेळी विज्ञान विषयाचे सहशिक्षक संघपाल सोनकांबळे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या हस्ते गुरुजींच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमातून गुरुजींच्या शिक्षणविषयक कार्याचा व समाजघडणीतील योगदानाचा गौरव करण्यात आला. या प्रसंगी मुख्याध्यापक आनंद रामटेके,सहशिक्षक नामदेव अनंत्रे, शशिकांत मांजरे,सहशिक्षिका श्रीमती निर्मला वाघमारे, सुजितकुमार जाधव,बबन यादव यांच्यासह सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रम वातावरण अत्यंत श्रद्धामय व प्रेरणादायी होते.
More Stories
विद्यामंदिर हायस्कूल आष्टा येथे शिक्षण महर्षी कै.ज्ञानदेव मोहेकर गुरुजींच्या प्रतिमेचे पूजन
विद्यामंदिर हायस्कूल आष्टात कै. ज्ञानदेव मोहेकर गुरुजींच्या स्मृतीस अभिवादन
विद्यामंदिर हायस्कूल,आष्टा येथे ७७ वा प्रजासत्ताक दिन देशभक्तीच्या वातावरणात उत्साहात साजरा