कळंब —आजच्या राजकीय परिस्थितीत ईव्हीएममुळे होत असलेली लोकशाहीची पायमल्ली रोखण्यासाठी EVM हटाव – लोकतंत्र बचाव या अभियानांतर्गत धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठान (म. रा.)चे संस्थापक अध्यक्ष बाळराजे (दादा) आवारे पाटील यांच्या नेतृत्वाखाली दिनांक १६ जानेवारी २०२६ पासून ग्रामपंचायत कार्यालय तांदुळवाडी, ता.कळंब,जि.धाराशिव येथे अमरण उपोषण सुरू आहे. या लोकशाहीसाठीच्या लढ्यास कळंब तालुक्यातील अखिल भारतीय बौद्ध महासभा व मागासवर्गीय सेवानिवृत्त कर्मचारी संघ,शाखा कळंब यांच्या वतीने उपोषणस्थळी प्रत्यक्ष भेट देऊन जाहीर पाठिंबा देण्यात आला. याप्रसंगी अखिल भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण धावारे,तसेच सी.आर.घाडगे, मारुती गायकवाड,गौतम वाघमारे, सुरेंद्र शीलवंत,भास्कर सोनवणे, अर्जुन ताकपीरे,श्रीधर सावंत व जोगदंड आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थितांनी लोकशाही अबाधित राखण्यासाठी ईव्हीएम हटाव ही काळाची गरज असल्याचे मत व्यक्त केले.
More Stories
“आरक्षणावर उपवर्गीकरणाचा घाव चालणार नाही” कळंबमध्ये ४ मे रोजी भव्य मोर्चाची हाक
भोसा गावातील विद्यार्थ्यांची एस.टी.बससाठी हाक; शिक्षणासाठी प्रवासाचा मोठा प्रश्न ऐरणीवर
समता,शिक्षण आणि न्यायाचा दीप प्रज्वलित – मोहेकर महाविद्यालयात महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्साहात साजरी