आष्टा — ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ. अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने व मुख्याध्यापक आनंद रामटेके यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यामंदिर हायस्कूल,आष्टा येथे राजमाता जिजाऊ साहेब व स्वामी विवेकानंद यांची जयंती सोमवार, दिनांक १२ जानेवारी २०२५ रोजी उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या प्रारंभी शालेय समितीचे अध्यक्ष चंद्रकांत काकडे आबा यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ साहेब यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले, तर १९७० च्या बॅचचे माजी विद्यार्थी वसंतभाऊ सोपानराव गिलबीले यांच्या हस्ते स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
More Stories
ग्रामीण भागात ज्ञानदीप पेटवणाऱ्या शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना विद्यामंदिर हायस्कुल आष्टा येथे अभिवादन
शिक्षण महर्षी कै.ज्ञानदेव मोहेकर गुरुजींच्या प्रतिमेचे पूजन
राष्ट्रसंत गाडगे महाराजांच्या जयंतीनिमित्त विद्यामंदिर हायस्कूल आष्टा येथे अभिवादन