March 26, 2026

ज्ञान प्रसार विद्यालयात राष्ट्रनिर्मितीच्या प्रेरणादायी विभूतींना वंदन

  • मोहा — ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ. अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने व प्राचार्य अविनाश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ज्ञान प्रसार माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, मोहा येथे राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन कार्यक्रम उत्साहात पार पडला.
    या कार्यक्रमास मुख्याध्यापक तथा प्राचार्य अविनाश मोरे, पर्यवेक्षक सतीश कानगुडे, उच्च माध्यमिक विभागाचे प्रा. सुनील साबळे, तसेच सहशिक्षक सुर्यकांत गुंगे, जनार्दन भामरे, अशोक राऊत, सतीश मडके, प्रा. विठ्ठल जाधव, प्रा. रोहित मोहेकर, प्रा. दिग्विजय पाटील, प्रा. प्रतिभा सावंत आदी मान्यवर उपस्थित होते.
    सर्वप्रथम राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन प्राचार्य अविनाश मोरे यांच्या हस्ते करण्यात आले.
    यानंतर विद्यार्थ्यांनी दोन्ही महान विभूतींच्या जीवनकार्यावर आधारित भाषणे सादर केली. जान्हवी लोकरे, समृद्धी लोकरे, दिव्या कांबळे व प्रिया जाधव या विद्यार्थिनींनी आपल्या मनोगतातून जिजाऊंच्या संस्कारमूल्ये व स्वामी विवेकानंदांचे राष्ट्रउभारणीचे विचार प्रभावीपणे मांडले.
    कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. शेखर गिरी यांनी केले, तर सहशिक्षक ज्योतिराम सोनके यांनी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंदांच्या विचारांचे महत्त्व अधोरेखित करून उपस्थितांचे आभार मानले.
    या कार्यक्रमास सर्व शिक्षक-शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभक्ती, चारित्र्यनिर्मिती व सामाजिक जबाबदारीची जाणीव अधिक दृढ झाल्याचे चित्र दिसून आले.
error: Content is protected !!