February 8, 2026

मातोळ्यात जिजाऊ–विवेकानंद जयंती उत्साहात साजरी

  • मातोळा — ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ. अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने व प्राचार्य अजित साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली श्री माधवराव भोसले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,मातोळा येथे राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब व स्वामी विवेकानंद यांचा जन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.
    या कार्यक्रमास प्रशालेचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य अजित साळवे,पर्यवेक्षक डबे तसेच शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. जिजाऊ माँसाहेबांच्या संस्कारमूल्यांचा व स्वामी विवेकानंदांच्या राष्ट्रउभारणीच्या विचारांचा विद्यार्थ्यांमध्ये जागर करण्यात आला.
    या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभक्ती,चारित्र्यनिर्मिती व सामाजिक जबाबदारीची जाणीव अधिक दृढ झाल्याचे चित्र दिसून आले.
error: Content is protected !!