पुणे – महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या वतीने प्रभाग क्रमांक १७ मध्ये भव्य बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले.या रॅलीत प्रभागातील अ – प्रेम संतोष कसबे, ब – सौ.अंजुम इम्तियाज मोमीन,क –स्वाती तुषार गोफणे व ड – समीर आण्णा तुपे या उमेदवारांच्या प्रचारार्थ आमदार कैलास पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आले. ही बाईक रॅली केवळ निवडणूक प्रचारापुरती मर्यादित नव्हती,तर पुणे शहरात वाढलेल्या अन्याय, भ्रष्टाचार व अपयशी कारभाराविरोधातील लढ्याची ठाम सुरुवात असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. पुणेकरांना स्वच्छ,पारदर्शक व लोकाभिमुख प्रशासन हवे आहे, आणि त्यासाठी महाविकास आघाडी कटिबद्ध आहे,असे आमदार कैलास पाटील यांनी यावेळी सांगितले. रॅली दरम्यान शहरातील प्रमुख मार्गांवरून उमेदवारांनी व कार्यकर्त्यांनी दुचाकींवरून प्रचार केला. परिवर्तन घडवूया,जनतेचे सरकार आणूया अशा घोषणा देत परिसर दुमदुमून गेला. नागरिकांनीही ठिकठिकाणी रॅलीचे स्वागत करत महाविकास आघाडीच्या उमेदवारांना उत्स्फूर्त पाठिंबा दिला. या रॅलीत डॉ.संतोष भैय्या मडके, स्वप्नील बापू मडके,संभाजी वीर, अमोल शेकदार,प्रशांत धोंगडे यांच्यासह मोठ्या संख्येने तरुण कार्यकर्ते व जागरूक नागरिक सहभागी झाले होते. त्यांच्या उत्साहामुळे आणि सहभागामुळे ही रॅली परिवर्तनाची नवी ऊर्जा घेऊन पुढे जात असल्याचे चित्र पाहायला मिळाले. प्रभाग क्रमांक १७ मध्ये विकास, पारदर्शकता आणि लोकहिताचे प्रश्न केंद्रस्थानी ठेवून महाविकास आघाडी आपला प्रचार अधिक तीव्र करणार असल्याचा निर्धार यावेळी उमेदवारांनी व्यक्त केला.
More Stories
गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला पुण्यात कर्तृत्ववान महिलांचा भव्य गौरव सोहळा
शरद सावंत यांना “मराठवाडा ग्लोबल उद्योजक” पुरस्कार प्रदान
पुण्यात राज्यस्तरीय महिला असेंब्ली उत्साहात;न्याय व संविधानिक हक्कांसाठी कृती आराखडा जाहीर