February 8, 2026

संभाजी विद्यालयात शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींच्या प्रतिमेचे पूजन संपन्न

  • पिंपळगाव (लिंगी) – कळंब तालुक्यातील पिंपळगाव (लिंगी) येथील संभाजी विद्यालयात दि.८ जानेवारी २०२६,गुरुवार रोजी शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजी (आण्णा) यांच्या प्रतिमेचे विधीवत पूजन करण्यात आले.
    हा कार्यक्रम ज्ञान प्रसारक मंडळ, येरमाळा यांचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने तसेच प्रशालेचे मुख्याध्यापक युवराज सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला.
    पूजनाचा विधी मुख्याध्यापक युवराज सावंत यांच्या हस्ते पार पडला.यावेळी प्रशालेतील शिक्षक सुनिल बावकर,संतोष ढोले, संतोष बोडके,सांस्कृतिक विभाग प्रमुख सुहास जगताप तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी शिवराम शिंदे, फुरडे एल.आर.आदी मान्यवर उपस्थित होते.
    याप्रसंगी शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींच्या शैक्षणिक कार्याचा आदर्श विद्यार्थ्यांनी आत्मसात करावा,असे मत व्यक्त करण्यात आले.कार्यक्रम प्रसन्न व शिस्तबद्ध वातावरणात पार पडला.
error: Content is protected !!