पिंपळगाव (लिंगी) – ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने व मुख्याध्यापक युवराज सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली दि.१ जानेवारी २०२६ वार गुरुवारी संभाजी विद्यालय येथे शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजी (आण्णा) यांच्या प्रतिमेचे पूजन मुख्याध्यापक युवराज सावंत यांच्या हस्ते संपन्न झाले. या प्रसंगी विद्यालयातील शिक्षक सुनिल बावकर,संतोष ढोले, संतोष बोडके,सांस्कृतिक विभाग प्रमुख सुहास जगताप तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी शिवराम शिंदे, फुरडे एल.आर.आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमातून शिक्षणाच्या माध्यमातून मूल्यवर्धनाचे कार्य अधिक दृढ करण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला.
More Stories
संभाजी विद्यालयात शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींच्या प्रतिमेचे पूजन
विद्यार्थ्यांची तहान भागवली! शिवम बोअरवेल कन्हेरवाडीची निस्वार्थ सेवा; बंद बोअरवेल मोफत दुरुस्त
संभाजी विद्यालयात जिजाऊ–विवेकानंद जयंती उत्साहात साजरी