कळंब — ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळ्याचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ. अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने व मुख्याध्यापक सुभाष लाटे यांच्या मार्गदर्शनाखाली दि.१ जानेवारी २०२६ रोजी विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरात संस्थापक अध्यक्ष कै.शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमास मुख्याध्यापक सुभाष लाटे,सर्व शिक्षक-शिक्षिका तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.शिक्षण क्षेत्रातील मोहेकर गुरुजींच्या कार्यापासून प्रेरणा घेऊन नववर्षात अधिक जोमाने शैक्षणिक कार्य करण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.
More Stories
“आरक्षणावर उपवर्गीकरणाचा घाव चालणार नाही” कळंबमध्ये ४ मे रोजी भव्य मोर्चाची हाक
भोसा गावातील विद्यार्थ्यांची एस.टी.बससाठी हाक; शिक्षणासाठी प्रवासाचा मोठा प्रश्न ऐरणीवर
समता,शिक्षण आणि न्यायाचा दीप प्रज्वलित – मोहेकर महाविद्यालयात महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्साहात साजरी