September 21, 2026

“सही-स्वाक्षरी म्हणजे व्यक्तिमत्त्वाचे प्रतिबिंब” – आढाळा शाळेत अभिनव कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद

  • कळंब – भविष्यातील तरुण पिढीमध्ये स्वाक्षरी ही व्यक्तिमत्त्वाचे प्रतिबिंब असते या संकल्पनेतून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आढाळा येथे “सही-स्वाक्षरी-सिग्नेचर” ही अभिनव कार्यशाळा आयोजित करण्यात आली.उपक्रमशील मुख्याध्यापक राजेंद्र बिक्कड यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यशाळा पार पडली.
    कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपक्रमशील शिक्षक तुकाराम कऱ्हाळे व शिवनंदा स्वामी यांनी डिजिटल माध्यमातून विविध क्षेत्रातील मान्यवरांची स्वाक्षरी विद्यार्थ्यांसमोर सादर केली.यात लोकनेते शरद पवार,गोपीनाथराव मुंडे,विलासराव देशमुख,ज्येष्ठ लेखक पु.ल.देशपांडे,व्यंगचित्रकार राज ठाकरे,माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण,अभिनेते अशोक सराफ,क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर,भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खेळाडू विराट कोहली आदींच्या स्वाक्षऱ्यांचा समावेश होता.
    आपली स्वाक्षरी ही सुंदर,स्पष्ट व व्यक्तिमत्त्व दर्शवणारी असावी या भावनेतून विद्यार्थ्यांनी व्हाईटबोर्ड व फलकावर स्वाक्षऱ्या केल्या. ज्या विद्यार्थ्यांच्या स्वाक्षऱ्यांमध्ये त्रुटी होत्या त्यांना मार्गदर्शन करून सुधारित स्वाक्षरी करण्यास प्रवृत्त करण्यात आले.विद्यार्थ्यांनी या उपक्रमात उत्साहाने सहभाग घेत मोठ्या आनंदात कार्यशाळा अनुभवली.
    या उपक्रमासाठी शिवव्याख्याते महादेव खराटे,शिक्षक तुकाराम कऱ्हाळे,शिवनंदा स्वामी,बलभीम राऊत व स्वयंसेवक बापू हगारे यांनी विशेष परिश्रम घेतले.
error: Content is protected !!