September 23, 2026

संभाजी विद्यालयात शिक्षण महर्षी कै.ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना भावपूर्ण अभिवादन

  • पिंपळगाव (लिंगी) – ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळ्याचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने व मुख्याध्यापक युवराज सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली दि.१८ डिसेंबर २०२६ रोजी वार गुरुवार रोजी संभाजी विद्यालय, पिंपळगाव (लिंगी),ता.वाशी येथे संस्थापक अध्यक्ष शिक्षण महर्षी कै.ज्ञानदेव मोहेकर गुरुजी (अण्णा) यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
    या कार्यक्रमात प्रशालेचे मुख्याध्यापक युवराज सावंत यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले.यावेळी प्रशालेतील शिक्षक सुनील बावकर,संतोष ढोले,संतोष बोडके,सुहास जगताप तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी शिवराम शिंदे, फुरडे एल.आर.आदी उपस्थित होते.
    शिक्षण क्षेत्रात मोलाचे योगदान देणाऱ्या कै.ज्ञानदेव मोहेकर गुरुजींच्या कार्याचा गौरव यावेळी करण्यात आला.कार्यक्रम शांत व प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला.
error: Content is protected !!