कळंब – ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ. अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने व प्राचार्य डॉ.हेमंत भगवान यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालय, कळंब येथे गुरुवार दि.१८ डिसेंबर २०२५ रोजी संस्थापक अध्यक्ष शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना भावपूर्ण अभिवादन करण्यात आले. यावेळी डॉ.विकास हुंबे यांच्या हस्ते गुरुजींच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विधीवत पूजन करण्यात आले. कार्यक्रमास सचिव डॉ.अशोकराव मोहेकर,प्रा.योगीराज मेटे,संचालक प्रा.वसंत मडके,प्राचार्य डॉ.हेमंत भगवान,उपप्राचार्य तथा उपसंपादक डॉ.कमलाकर जाधव, उपसंपादक अरविंद शिंदे,डॉ.दत्ता साकोळे,डॉ.दादाराव गुंडरे,संदीप सूर्यवंशी आदी मान्यवर उपस्थित होते. या प्रसंगी शिक्षण क्षेत्रातील गुरुजींच्या कार्याचा गौरव करण्यात आला. उपस्थितांनी त्यांच्या शैक्षणिक कार्यास उज्ज्वल आदरांजली अर्पण केली.
More Stories
“आरक्षणावर उपवर्गीकरणाचा घाव चालणार नाही” कळंबमध्ये ४ मे रोजी भव्य मोर्चाची हाक
भोसा गावातील विद्यार्थ्यांची एस.टी.बससाठी हाक; शिक्षणासाठी प्रवासाचा मोठा प्रश्न ऐरणीवर
समता,शिक्षण आणि न्यायाचा दीप प्रज्वलित – मोहेकर महाविद्यालयात महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्साहात साजरी