कन्हेरवाडी – ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ. अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने व मुख्याध्यापक सुनील पांचाळ यांच्या मार्गदर्शनाखाली विद्या विकास हायस्कूल,कन्हेरवाडी ता. कळंब येथे दि.१३ डिसेंबर २०२५, शनिवार रोजी गणित दिनानिमित्त विद्यार्थ्यांसाठी गणित स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. सदरील स्पर्धा गणित विषयाचे सहशिक्षक ए.बी.देशमुख यांच्या संकल्पनेतून इयत्ता ९ वीच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आली. या स्पर्धेत एकूण ७९ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. विद्यार्थ्यांनी गणितीय संकल्पना, तर्कशक्ती व अचूकतेचे उत्तम प्रदर्शन करत स्पर्धेला रंगत आणली. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये गणित विषयाची गोडी निर्माण होऊन त्यांच्या विचारशक्तीला चालना मिळाली. शालेय स्तरावर अशा शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन केल्याने विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढण्यास मदत होते, असे मत उपस्थित शिक्षकांनी व्यक्त केले.
More Stories
विद्या विकास हायस्कूल कन्हेरवाडीचा एनएमएमएस २०२६ मध्ये झळाळता यश!
विद्या विकास हायस्कूलमध्ये शास्त्रज्ञ डॉ.बालाजी आगलावे यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन
विद्याविकास हायस्कूल,कन्हेरवाडी येथे “सा.साक्षी पावनज्योत”वाढदिवस विशेषांकाचे प्रकाशन