May 7, 2026

विद्यार्थिनींच्या वाढदिवसाला सामाजिक अर्थ;विद्यामंदिर हायस्कुलमध्ये शिक्षणमहर्षी ज्ञानदेव (अण्णा) मोहेकर गुरुजींना अभिवादन

  • आष्टा – ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ. अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने व विद्यामंदिर हायस्कुल,आष्टा येथील मुख्याध्यापक आनंद रामटेके यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थापक अध्यक्ष शिक्षण महर्षी ज्ञानदेव (अण्णा) मोहेकर गुरुजी यांच्या प्रतिमेचे पूजन व अभिवादन कार्यक्रम पार पडला.
    इयत्ता आठवीची विद्यार्थिनी कु. ज्ञानेश्वरी लहू माळी व इयत्ता नववीची विद्यार्थिनी कु.करूणा दत्ता माळी यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या हस्ते शिक्षण महर्षींच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला.वाढदिवस सामाजिक उपक्रमात साजरा करण्याचा आदर्श या दोन्ही विद्यार्थिनींनी यावेळी घालून दिला.
    या कार्यक्रमास विद्यालयाचे मुख्याध्यापक आनंद रामटेके, ज्येष्ठ सहशिक्षक नामदेव अंनत्रे, शशिकांत मांजरे,संघपाल सोनकांबळे,सहशिक्षिका श्रीमती निर्मला वाघमारे,सुजितकुमार जाधव,बबन यादव यांच्यासह शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
    शिक्षण महर्षी ज्ञानदेव (अण्णा) मोहेकर गुरुजींच्या शिक्षणविषयक विचारांचा वारसा जपत विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव, संस्कार आणि कर्तव्यभावना निर्माण करण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
error: Content is protected !!