कन्हेरवाडी – ज्ञान प्रसारक मंडळ,येरमाळा संचलित विद्या विकास हायस्कूल,कन्हेरवाडीने एनएमएमएस (National Means-cum-Merit Scholarship) परीक्षा २०२६ मध्ये उल्लेखनीय यश संपादन करत शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेची पुन्हा एकदा प्रचिती दिली आहे. संस्थेचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ. अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेतून व मुख्याध्यापक सुनील पांचाळ यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी हे यश मिळवले आहे. यावर्षीच्या परीक्षेत शाळेतील तब्बल दहा विद्यार्थ्यांनी उत्तम गुण मिळवत आपली गुणवत्ता सिद्ध केली.कामाक्षी श्रीहरी डावकरे हिने १४८ गुण मिळवत शाळेत प्रथम क्रमांक पटकावला. श्रेया विजय कवडे (१११ गुण) हिने द्वितीय, तर सिद्धी सचिन कवडे (१०८ गुण) हिने तृतीय क्रमांक मिळवला. तेजस बालाजी कवडे (१०१ गुण) आणि प्रगती अनंत जगताप (९९ गुण) यांनीही उल्लेखनीय कामगिरी केली. तसेच अक्षरा लहू कवडे (८९ गुण),ओंकार धनंजय वामन (८४ गुण),रुद्र विनोद कवडे (८० गुण), सावित्री तुकाराम पुरी (७५ गुण) आणि श्रेयस शिवाजी जाधव (६६ गुण)यांनीही यश संपादन करत शाळेचा नावलौकिक वाढवला आहे. या यशामागे विद्यार्थ्यांची जिद्द, चिकाटी आणि सातत्यपूर्ण परिश्रम याबरोबरच शिक्षकांचे मार्गदर्शन व पालकांचे सहकार्य महत्त्वाचे ठरले.शाळेत घेतलेले विशेष मार्गदर्शन वर्ग,सराव परीक्षा व नियोजनबद्ध अभ्यास पद्धतीमुळे विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक परीक्षेची योग्य तयारी करता आली. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे सचिव डॉ.अशोकराव मोहेकर, मुख्याध्यापक सुनील पांचाळ तसेच सर्व शिक्षक-शिक्षिका यांनी अभिनंदन करून त्यांच्या भावी शैक्षणिक वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. या यशामुळे कन्हेरवाडी परिसरात शाळेचे कौतुक होत असून इतर विद्यार्थ्यांसाठीही हे प्रेरणादायी ठरत आहे.
More Stories
गणित दिनानिमित्त विद्या विकास हायस्कूल कन्हेरवाडी येथे विद्यार्थ्यांची गणितीय बुद्धिमत्ता स्पर्धेतून उजागर
विद्या विकास हायस्कूलमध्ये शास्त्रज्ञ डॉ.बालाजी आगलावे यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन
विद्याविकास हायस्कूल,कन्हेरवाडी येथे “सा.साक्षी पावनज्योत”वाढदिवस विशेषांकाचे प्रकाशन