April 25, 2026

“कन्हेरवाडीच्या कामाक्षीचे यश झळाळले” NMMS परीक्षेत जिल्ह्यात ९ वा क्रमांक,शिष्यवृत्ती प्राप्त

  • कळंब (अविनाश घोडके) – ज्ञान प्रसारक मंडळ,येरमाळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने व विद्या विकास हायस्कूल,कन्हेरवाडीचे मुख्याध्यापक सुनील पांचाळ यांच्या मार्गदर्शनाखाली इयत्ता ८ वी मधील विद्यार्थीनी कु.डवकरे कामाक्षी श्रीहरी हिने NMMS परीक्षा २९२५–२६ मध्ये उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
    कामाक्षी हिने या स्पर्धात्मक परीक्षेत जिल्ह्यात नववा क्रमांक मिळवत शाळेचे व गावाचे नाव उज्ज्वल केले आहे.तिच्या या यशामुळे ती शिष्यवृत्तीधारक ठरली असून तिला दरवर्षी १२,००० रुपयांची शिष्यवृत्ती मिळणार आहे.

  • या यशाबद्दल कर्तव्यदक्ष सचिव डॉ.अशोकराव मोहेकर,
    मुख्याध्यापक सुनील पांचाळ तसेच सहशिक्षक संतोष आगलावे,संजय कुमार माळी, मनोज कुमरे,संतोष मोरे,अमर पाटील आदींनी तिचे अभिनंदन केले आहे.तसेच कामाक्षीला पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
    कामाक्षीच्या या यशामुळे कन्हेरवाडी परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून इतर विद्यार्थ्यांसाठीही ती प्रेरणादायी ठरली आहे.
error: Content is protected !!