मोहा – ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने प्राचार्य अविनाश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ज्ञान प्रसार माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,मोहा येथे नुकतेच पालक मेळाव्याचे आयोजन उत्साहात पार पडले. या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी ह.भ.प.अशोक (बप्पा) मडके होते.प्रमुख उपस्थितीमध्ये मोहा येथील माजी अभियंता सतीश (बाबा) जोशी,संस्थेचे प्रशासकीय अधिकारी रमेश (भाऊ) मोहेकर, मोहा गावचे पोलीस पाटील प्रकाश गोरे,मोहा पत्रकार संघाचे अध्यक्ष दिलीप झोरी,पालक प्रतिनिधी सुदर्शन लोकरे,मुख्याध्यापक तथा प्राचार्य अविनाश मोरे,पर्यवेक्षक सतीश कानगुडे यांचा समावेश होता. कार्यक्रमाची सुरुवात शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजी यांच्या प्रतिमेच्या पूजनाने करण्यात आली.प्रास्ताविकात प्राचार्य अविनाश मोरे यांनी विद्यालयातील शैक्षणिक सुविधा, राबविण्यात येणारे विविध उपक्रम, विद्यार्थ्यांची शैक्षणिक व व्यक्तिमत्त्व विकासासाठी केली जाणारी तयारी तसेच भविष्यातील नियोजन याविषयी पालकांना सविस्तर माहिती दिली. यानंतर सहशिक्षक सूर्यकांत गुंगे, ज्योतीराम सोनके,प्रा.देवदत्त पाटील व अटल लॅबचे कोऑर्डिनेटर असलम शेख यांनी मनोगतातून पालकांशी संवाद साधला.पालक प्रतिनिधी सुदर्शन लोकरे यांनी पालकांसाठी मार्गदर्शक व विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी विचार व्यक्त केले.
प्रमुख पाहुणे माजी अभियंता सतीश (बाबा) जोशी यांनी शाळेत मिळणाऱ्या ज्ञानाचा उपयोग विद्यार्थ्यांनी व्यावहारिक जीवनात करता आला पाहिजे,असे प्रतिपादन केले.अध्यक्षीय समारोपात ह.भ.प.अशोक (बप्पा) मडके यांनी विद्यालय हे विद्यार्थी परिवर्तनाचे प्रभावी माध्यम असल्याचे नमूद करून,शाळेचा प्रमुख हा कुटुंबप्रमुखाप्रमाणे जबाबदारी पार पाडत असतो व प्राचार्य मोरे हे ती भूमिका अत्यंत चोखपणे बजावत असल्याचे गौरवोद्गार काढले. पालक मेळाव्यासारखे उपक्रम पालक-शाळा-विद्यार्थी यांतील नाते अधिक दृढ करतात,असेही त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.शेखर गिरी व सहशिक्षिका नीता सोनवणे यांनी केले,तर आभार प्रदर्शन सहशिक्षक सतीश मडके यांनी केले. या मेळाव्यास पत्रकार श्रीकांत मडके,रमेश मडके,महादेव मडके, उस्मान पठाण,संतोष माळी यांच्यासह पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
More Stories
शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना ज्ञान प्रसार विद्यालयात भावपूर्ण अभिवादन
ज्ञान प्रसार प्राथमिक विद्यालय मोहा येथे शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींच्या प्रतिमेचे पूजन
शिक्षण महर्षी कै.ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना ज्ञान प्रसार विद्यालयात भावपूर्ण अभिवादन