धाराशिव (जिमाका)– “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांपैकी ज्यांच वडील हयात नाहीत, पती हयात नाहीत किंवा ज्यांचा घटस्फोट झालेला आहे, अशा सर्व पात्र महिलांनी स्वतःचे ई-केवायसी करणे आवश्यक आहे. ई-केवायसीनंतर पती अथवा वडील यांचे अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र, घटस्फोट प्रमाणपत्र किंवा नयायालयाचे आदेश यांची सत्यप्रत संबंधित अंगणवाडी सेविकेकडे ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत जमा करावयाची आहे. ही प्रक्रिया ऑफलाईन पद्धतीने करावयाची आहे. तसेच, या योजनेच्या https://ladakibahin.maharashtra.gov.in या वेब पोर्टलवरील ई-केवायसी प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने अंतिम करणे आवश्यक असल्यामुळे पोर्टलवर आवश्यक त्या सुधारणा करण्यात आलेल्या आहेत. त्यानुषंगाने जिल्ह्यातील पात्र लाभार्थी महिलांनी सदर वेब पोर्टलवर भेट देऊन ई-केवायसी प्रक्रिया ऑनलाईन पूर्ण करावी. ज्या पात्र लाभार्थी महिलांनी पूर्वी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली आहे आणि पर्याय निवडताना काही चुका झाल्या आहेत, अशा लाभार्थ्यांसाठी एक अंतिम संधी (One Time Edit Option) उपलब्ध करून देण्यात आली आहे. ही संधी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंतच उपलब्ध राहणार आहे. त्यानंतर कोणताही बदल करण्याची सुविधा मिळणार नाही. त्यामुळे ई-केवायसीमध्ये सर्व माहिती अचूक भरावी,असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी,धाराशिव यांनी केले आहे.
More Stories
इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या पुरस्काराकरिता अर्ज करण्याचे आवाहन
मतदानाचा हक्क बजावण्यासाठी कामगारांना ७ फेब्रुवारी रोजी भरपगारी रजा देणे बंधनकारक
दुखवट्यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचा मतदान दिवस बदलला;आता ७ फेब्रुवारीला मतदान