February 8, 2026

“डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त ‘वाचन प्रेरणा दिन’ उत्साहात साजरा

  • विद्यार्थ्यांनी पुस्तकांशी मैत्रीचा संकल्प केला!”
    भूम – ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळाचे अध्यक्ष अनिल (बापू) मोहेकर व कर्तव्यदक्ष सचिव डॉ. अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने तसेच मुख्याध्यापक आनंद रामटेके यांच्या मार्गदर्शनाखाली भूम तालुक्यातील आष्टा येथील विद्यामंदिर हायस्कूलमध्ये दिनांक १५ ऑक्टोबर २०२५ रोजी माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त ‘वाचन प्रेरणा दिन’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
    कार्यक्रमात डॉ. कलाम यांच्या प्रतिमेस मुख्याध्यापक आनंद रामटेके यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.विद्यार्थ्यांनी विविध पुस्तके वाचून ‘वाचन प्रेरणा दिन’ साजरा केला.
    याप्रसंगी मुख्याध्यापक आनंद रामटेके,सहशिक्षक नामदेव अंनत्रे, शशिकांत मांजरे,संघपाल सोनकांबळे,सहशिक्षिका श्रीमती निर्मला वाघमारे,सुजितकुमार जाधव,बबन यादव आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!