March 26, 2026

कळंब पोस्ट ऑफिस ठप्प! जीडीएस ऑपरेटर नसल्याने ‘लाडकी बहीण’, ‘शेतकरी सन्मान’, ‘शिष्यवृत्ती’ लाभार्थी त्रस्त

  • कळंब ( माधवसिंग राजपूत) :- कळंब पोस्ट कार्यालयात गेल्या चार महिन्यांपासून ग्रामीण डाक सेवक (जीडीएस) ऑपरेटर नसल्यामुळे आधार दुरुस्ती आणि अपडेटचे काम पूर्णपणे ठप्प झाले आहे.त्यामुळे लाडकी बहीण, शेतकरी सन्मान योजना,विद्यार्थी शिष्यवृत्ती आदी शासकीय योजनांच्या लाभार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
    डाक विभागांतर्गत चालणाऱ्या आधार नोंदणी व दुरुस्ती केंद्रातून नागरिकांना नवीन आधार कार्ड काढणे,नांव,जन्मतारीख,पत्ता, मोबाईल नंबर,ई-मेल आयडी तसेच फोटो-बोटाचे ठसे अपडेट करण्याची सुविधा मिळते.मात्र जीडीएस ऑपरेटरच्या राजीनाम्यानंतर हे केंद्र बंद असून, नागरिकांना हे काम नेट-कॅफेतून करवून घ्यावे लागत आहे.यामुळे जास्तीचे पैसे आकारले जात असल्याने वृद्ध नागरिक आणि विद्यार्थी आर्थिक अडचणीत सापडले आहेत.
    कळंब पोस्ट ऑफिसमध्ये सध्या तीन कर्मचारी कार्यरत असून पोस्टमास्तरची जागा देखील रिक्त आहे. प्रभारी उप-डाकपाल विनोद साहेबराव वानखेडे यांनी सांगितले की, “जीडीएस नेमणुकीविषयी वरिष्ठ कार्यालयाला कळविण्यात आले आहे. नवीन नियुक्ती वरिष्ठ कार्यालयाच्या अधिन असल्याने सध्या सांगता येत नाही.”
    नागरिकांनी तात्काळ नवीन जीडीएस ऑपरेटरची नेमणूक करून आधार नोंदणी व दुरुस्ती केंद्र सुरु करावे,अशी मागणी केली आहे.

वरिष्ठ कार्यालयाकडे जीडीएस नेमणूक विषयी कळविले आहे. वरील विषय वरिष्ठ कार्यालयाच्या अधिन असल्याने नवीन नियुक्ती विषयी सांगता येत नाही.

– विनोद साहेबराव वानखेडे,प्रभारी,उप डाकपाल, कळंब

 

error: Content is protected !!