March 26, 2026

वेद शैक्षणिक संकुलात ‘वाचन प्रेरणा दिन’ उत्साहात साजरा!

  • कळंब – धनेश्वरी शिक्षण समूहाचे अध्यक्ष डॉ.प्रतापसिंह पाटील यांच्या प्रेरणेने व प्राचार्य सतिश मातने यांच्या मार्गदर्शनाखाली वेद शैक्षणिक संकुल अंतर्गत भैरवनाथ अध्यापक विद्यालय व भैरवनाथ औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत दि. १५ ऑक्टोबर २०२५ वार बुधवार रोजी माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त ‘वाचन प्रेरणा दिन’ उत्साहात साजरा करण्यात आला.
    कार्यक्रमाची सुरुवात डॉ.कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली.त्यानंतर विद्यार्थ्यांकडून वाचन सत्राचे आयोजन करण्यात आले.या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी, विचारसंपन्नता आणि ज्ञानवृद्धीचा संदेश देण्यात आला.
    या प्रसंगी भैरवनाथ औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य सुरज भांडे,मराठी विभाग प्रमुख प्रा.श्रीकांत पवार,प्रा.सुकेशनी गव्हाणे,प्रा.मोहिनी शिंदे, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.अविनाश घोडके,निदेशक अविनाश म्हेत्रे,निदेशक राजकुमार शिंदे,निदेशक बालाजी रामरुळे, आदित्य गायकवाड,दिक्षा गायकवाड,विनोद कसबे आदी मान्यवर उपस्थित होते.
error: Content is protected !!