विद्यामंदिर हायस्कुल,आष्टा येथे पुष्पहार अर्पण सोहळा संपन्न
आष्टा– ज्ञान प्रसारक मंडळ, येरमाळा यांचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने व मुख्याध्यापक आनंद रामटेके यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थापक अध्यक्ष शिक्षण महर्षी कै.ज्ञानदेव मोहेकर गुरुजी यांच्या प्रतिमेस दि.२५ सप्टेंबर २०२५ रोजी (वार गुरुवार) विद्यामंदिर हायस्कुल, आष्टा येथे पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी मुख्याध्यापक आनंद रामटेके यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर सहशिक्षक नामदेव अंनत्रे, शशिकांत मांजरे, संघपाल सोनकांबळे तसेच सहशिक्षिका श्रीमती निर्मला वाघमारे, सुजितकुमार जाधव, बबन यादव आदींनीही पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केले. या अभिवादन सोहळ्यात सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
More Stories
ग्रामीण भागात ज्ञानदीप पेटवणाऱ्या शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना विद्यामंदिर हायस्कुल आष्टा येथे अभिवादन
शिक्षण महर्षी कै.ज्ञानदेव मोहेकर गुरुजींच्या प्रतिमेचे पूजन
राष्ट्रसंत गाडगे महाराजांच्या जयंतीनिमित्त विद्यामंदिर हायस्कूल आष्टा येथे अभिवादन