पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन दिली धीराची व आर्थिक मदतीची साथ
भूम/परंडा – भूम व परंडा तालुक्यात सातत्याने कोसळणारा पाऊस आणि नद्यांना आलेल्या महापुरामुळे तालुक्यातील नागरिक व शेतकरी बांधव मोठ्या संकटात सापडले आहेत. या अस्मानी संकटाची पाहणी करण्यासाठी व शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा उपाध्यक्ष प्रवीण रणबागुल यांनी पूरग्रस्त भागांचा दौरा करून थेट शेतकऱ्यांच्या बांधावर भेट दिली. या प्रसंगी रणबागुल यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या व सांगितले की – “पूरामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे.शेतातील माती वाहून गेली,जनावरे दगावली, अन्नधान्य व संसारोपयोगी वस्तू वाहून गेल्या. या स्थितीत सरकारने तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना मदतीचा हात द्यावा. केंद्र व राज्य शासनाने संवेदनशीलता दाखवत शेतकऱ्यांना सरसकट नुकसानभरपाई जाहीर करावी.” शेतकरी बांधवांसोबत आम्ही भक्कमपणे उभे असल्याचा विश्वास देत, रणबागुल यांच्या वतीने पूरग्रस्त शेतकरी बाधितांना रोख रक्कम स्वरूपात मदत करण्यात आली. या वेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव धनंजय सोनटक्के, युवा आघाडी जिल्हा उपाध्यक्ष वैभव गायकवाड, परंडा तालुकाध्यक्ष रणवीर निकाळजे, युवा नेते संतोष हिवरे, ज्येष्ठ नेते उत्तरेश्वर बापू ठवरे, रघुनाथ गावडे, नवनाथ गावडे, किशोर गायकवाड, रियाज शेख, योगेश आवळे, उमेश आवळे यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी बांधव उपस्थित होते.
More Stories
जनसेवेची परंपरा कायम; नगरसेवक रत्नकांत ‘पापा’ शिंदे यांचा प्राध्यापकांकडून सत्कार
परंडा येथे ‘सोहळा दिव्यांगांचा,सोहळा सन्मानाचा’कार्यक्रम शेकडो दिव्यांगांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न
शिक्षण हाच मुक्तीचा मार्ग आहे हे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजाला शिकवले – प्राचार्य डॉ.सुनील जाधव