September 23, 2026

अविनाश मोरे यांचा आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरव

  • मोहा –शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर मल्टीस्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटी लिमिटेड,मोहातर्फे देण्यात येणारा आदर्श शिक्षक व मुख्याध्यापक पुरस्कार नुकताच ज्ञान प्रसार माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य अविनाश मोरे सर यांना प्रदान करण्यात आला.
    कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मोहा गावचे माजी सरपंच तथा ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळा चे प्रशासकीय अधिकारी रमेशभाऊ मोहेकर होते. प्रमुख उपस्थितीमध्ये संस्थेचे सचिव अशोक दादा मोहेकर, मल्टीस्टेटचे चेअरमन हनुमंततात्या मडके, मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल मडके, ह.भ.प. अशोकबप्पा मडके, केंद्रप्रमुख डिकले सर, नारायण नागटिळक, हनुमंतभाऊ मडके, भिंगारे मॅडम आदी मान्यवर उपस्थित होते.
    याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते प्राचार्य अविनाश मोरे सरांचा शाल, पुष्पहार, बुके व ट्रॉफी देऊन सन्मान करण्यात आला.
    प्राचार्य मोरे सर हे शिस्तप्रिय शिक्षक म्हणून परिचित असून, त्यांनी रुजू झाल्यापासून शिक्षक-शिष्य-शिस्त यांचा सुंदर समन्वय साधला आहे. शाळेतील वेळेचे काटेकोर व्यवस्थापन, नियमांचे पालन व वक्तशीरपणामुळे विद्यालयाचा चेहरामोहराच बदलल्याचे उपस्थितांनी नमूद केले.
    या कार्यक्रमाला ज्ञान प्रसार विद्यालयातील सर्व कर्मचारी, मल्टीस्टेटचे अधिकारी व कर्मचारी, विद्यार्थी, पालक, शिक्षक, बँक कर्मचारी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
error: Content is protected !!