आष्टा – पुरोगामी महाराष्ट्रात संत नामदेवांच्या उक्तीप्रमाणे “ज्ञान दीप लावू जगी” हे ध्येय समोर ठेवून आणि बुद्ध,शिव,फुले,शाहू, आंबेडकरांच्या विचारांची कास धरत निजामकालीन काळात दळणवळणाची कोणतीही साधने नसतानाही शिक्षणाचा प्रचार–प्रसार करणारे,ग्रामीण भागातील शेतकरी,कष्टकरी, मजूर,दिनदलित,बहुजनांच्या मुला–मुलींसाठी शिक्षणाची सोय उपलब्ध करून देणारे आदरणीय शिक्षणमहर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींनी सन १९५१ साली कळंब तालुक्यातील मोहा या गावी शिक्षणाचे पवित्र रोपटे लावले. यानंतर पूज्य गुरुजींनी ज्ञान प्रसारक मंडळाच्या माध्यमातून मराठवाड्यात विविध ठिकाणी प्राथमिक शाळा,माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालये,वरिष्ठ महाविद्यालये,वसतिगृहे स्थापन करून दर्जेदार शिक्षण देत संपूर्ण आयुष्य समाजहितासाठी समर्पित केले. त्यांच्या कार्याची गौरवपर परंपरा पुढे नेत, ज्ञान प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष कै. शिक्षणमहर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजी यांच्या प्रतिमेस दि.११ सप्टेंबर २०२५,वार गुरुवार,भूम तालुक्यातील आष्टा येथील विद्यामंदिर हायस्कूलमध्ये सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने व मुख्याध्यापक आनंद रामटेके यांच्या मार्गदर्शनाखाली पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी सहशिक्षक नामदेव अंत्रे, शशिकांत मांजरे,संघपाल सोनकांबळे,सहशिक्षिका श्रीमती निर्मला वाघमारे,सुजितकुमार जाधव, बबन यादव आदींनी उपस्थित राहून गुरुजींना आदरांजली वाहिली.
More Stories
विद्यामंदिर हायस्कूल आष्टा येथे शिक्षण महर्षी कै.ज्ञानदेव मोहेकर गुरुजींच्या प्रतिमेचे पूजन
विद्यामंदिर हायस्कूल आष्टात कै. ज्ञानदेव मोहेकर गुरुजींच्या स्मृतीस अभिवादन
विद्यामंदिर हायस्कूल,आष्टा येथे ७७ वा प्रजासत्ताक दिन देशभक्तीच्या वातावरणात उत्साहात साजरा