आष्टा – ज्ञान प्रसारक मंडळ, येरमाळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ. अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने व मुख्याध्यापक आनंद रामटेके यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यामंदिर हायस्कूल,आष्टा येथे झालेल्या तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत शाळेच्या विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला. सतरावर्षे वयोगटातील मुलींपैकी श्रावणी संतोष गिलबीले व गौरी संजय जाधव,तसेच मुलांमध्ये कृष्णा विनोद पाडुळे यांनी आपल्या-आपल्या गटात प्रथम क्रमांक मिळवून जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड निश्चित केली. यशस्वी विद्यार्थ्यांचा शाळेत पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला. या स्पर्धेत विद्यार्थ्यांना सहाय्यक शिक्षक शशिकांत मांजरे यांनी मार्गदर्शन केले. या प्रसंगी संस्थेचे सचिव डॉ. अशोकराव मोहेकर,अध्यक्ष अनिल मोहेकर यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.या कार्यक्रमाला मुख्याध्यापक आनंद रामटेके, ज्येष्ठ शिक्षक नामदेव अनंत्रे, संघपाल सोनकांबळे,सौ.निर्मला वाघमारे,सुजितकुमार जाधव, बबन यादव आदींसह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
More Stories
विद्यामंदिर हायस्कूल आष्टा येथे शिक्षण महर्षी कै.ज्ञानदेव मोहेकर गुरुजींच्या प्रतिमेचे पूजन
विद्यामंदिर हायस्कूल आष्टात कै. ज्ञानदेव मोहेकर गुरुजींच्या स्मृतीस अभिवादन
विद्यामंदिर हायस्कूल,आष्टा येथे ७७ वा प्रजासत्ताक दिन देशभक्तीच्या वातावरणात उत्साहात साजरा