कळंब – कळंब येथील महात्मा फुले अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त दि.५ सप्टेंबर २०२५ रोजी कळंब शहरातील तसेच पंचक्रोशीतील तसेच बीड जिल्हा परिषदेतील कार्यरत अनेक मान्यवर गुरुजनांचा भव्य स्वागत सत्कार सोहळा उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माळकरंजा येथील मुख्याध्यापक संतोष भोजने,सावित्रीबाई फुले विद्यालयाचे प्राचार्य काकासाहेब मुंडे,शहीद भगतसिंग प्राथमिक विद्यानिकेतन कळंब येथील मंगेश यादव,स्वतंत्र कनिष्ठ महाविद्यालय देवधानोरा येथील प्राचार्य महादेव गपाट,विद्याभवन हायस्कूल कळंब येथील मराठी विषयाचे अभ्यासक एस.जे.पवार, तसेच केज तालुक्यातील विविध शाळांतील देशमुख,लाखे,यांसह अनेक शिक्षक व प्राध्यापकांचा सन्मान करण्यात आला. याशिवाय धनंजय डोळस,प्रदीप यादव,ज्ञानेश्वर तोडकर,बोधिसत्व वाघमारे,सतीश बच्छाव, सेवानिवृत्त प्रा.लालासाहेब धोंगडे, प्रा.सुरेश धावारे,अनिल शेळके, सेवानिवृत्त मुख्याध्यापक अरुण गरड आदींचाही विशेष गौरव करण्यात आला. कार्यक्रमाला पत्रकार माधवसिंह राजपूत,शामराव कोयले,बापूराव भंडारे,पांडुरंग गंभीरे,जनार्धन धुमाळे,रमेश शिंदे,पुंडलिक करंजकर यांचीही उपस्थिती लाभली. गुरुजनांचा सन्मान पतसंस्थेचे चेअरमन प्रा.राजेंद्र खडबडे,सचिव अरुण माळी,संचालक सतपाल (बप्पा) बचुटे व धीरज दुधाळ यांच्या शुभहस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राचार्य महादेव गपाट व प्राचार्य काकासाहेब मुंडे यांनी केले. या वेळी चेअरमन प्रा.राजेंद्र खडबडे व सचिव अरुण माळी यांनी सांगितले की,पुढील काळात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त महिला शिक्षिकांचा व महात्मा ज्योतिराव फुले जयंतीनिमित्त शिक्षक बांधवांचा सत्कार करण्यात येईल. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आकाश माळी,सुभाष गायकवाड, अनिल शिंदे,सुनील कुशवाह, कैलास जाधव,सुरज टेलर्स,नाना फल्ले,महावीर गायकवाड आदींनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्वांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.
More Stories
डिकसळ येथे माता रमाई जयंती उत्साहात साजरी
बस तासनतास थांबवून प्रवाशांना त्रास;संतप्त प्रवाशांची तक्रार
विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिर येथे शिक्षण महर्षी कै.ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना अभिवादन