कळंब – कळंब उपविभागीय अधिकारी संजय पाटील यांच्यासह पुरवठा विभागातील सहाय्यक महसूल अधिकारी रमेश पवार आणि महसूल सेवक सुनील माळी यांनी महसूल विभागामध्ये उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांच्या हस्ते पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले.हा पुरस्कार वितरण सोहळा भुम येथे दि.४ ऑगस्ट रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. धाराशिव जिल्ह्यातील चारही उपविभागीय महसूल अधिकारी कार्यालयापैकी कळंब उपविभागाचे महसूल अधिकारी संजय पाटील यांनी २०२४-२०२५ मध्ये उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल त्यांना धाराशिव जिल्ह्यातील ‘सर्वोत्कृष्ट उपजिल्हाधिकारी’ म्हणून पुरस्कार देण्यात आला. तसेच कळंब येथील तहसीलच्या पुरवठा विभागातील सहाय्यक महसूल अधिकारी रमेश पवार यांनी पुरवठा विभागात जनसेवेचे कार्य उत्कृष्ट केल्याबद्दल त्यांना ‘उत्कृष्ट सहाय्यक महसूल अधिकारी’ म्हणून पुरस्कार प्रदान करण्यात आला.महसूल सेवकांनमध्ये महसूल सेवक सुनील माळी यांनी कळंब तहसीलसह उपविभागीय महसूल कार्यालयातील टपाल वरीष्ठ कार्यालयात निर्धारित वेळेत सादर करत,महसूल विभागात प्रामाणिकपणे कार्य केल्यामुळे त्यांनाही ‘उत्कृष्ट महसूल सेवक’ पुरस्कार देण्यात आला आहे. यावेळी महसूल विभागात उत्कृष्ट कामगिरी बजावलेल्या अन्य अधिकारी व कर्मचाऱ्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष,निवासी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव यांच्यासह महसूल प्रशासनातील अन्य मान्यवर अधिकारी,कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुरस्कार प्राप्त सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना विविध क्षेत्रातील लोकप्रतिनिधी,पदाधिकारी, अधिकारी,कर्मचारी,मित्र परिवार, नातेवाईक आणि आप्तेष्टांनी शुभेच्छा देऊन त्यांचे कौतुक केले.
More Stories
बजरंग ताटे जिल्हास्तरीय आदर्श समाजसेवा पुरस्काराने सन्मानित
कळंब येथे ज्येष्ठ नागरिक महासंघाच्या वतीने पालावर रक्षाबंधन
ग्रंथालयाच्या अभ्यासकांनी आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करावे – प्रा.डॉ.धर्मराज वीर