February 27, 2026

डीजे-डॉल्बी मुक्त रामनवमीचा संकल्प;अध्यक्षपदी प्रसन्न हुलसुरकर यांची धुरा

  • कळंब–आगामी रामनवमी २०२६ उत्सवाच्या पार्श्वभूमीवर रामराज्य प्रतिष्ठाण,कळंब यांच्या वतीने नियोजन बैठक उत्साहात संपन्न झाली.बैठकीत उत्सव अधिक भव्य,शिस्तबद्ध व भक्तिमय वातावरणात साजरा करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
    यंदाची रामनवमी मिरवणूक डीजे-डॉल्बी मुक्त काढण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय सर्वानुमते घेण्यात आला.
    पर्यावरणपूरक आणि शांततेत उत्सव साजरा करण्याचा संदेश देत पारंपरिक वाद्यांच्या गजरात आणि धार्मिक वातावरणात मिरवणूक काढण्याचे नियोजन करण्यात आले आहे.उत्सवाच्या विविध धार्मिक,सांस्कृतिक व सामाजिक उपक्रमांचेही प्राथमिक आराखडे निश्चित करण्यात आले.
    बैठकीत पुढील कार्यकारिणीची निवड जाहीर करण्यात आली —
    अध्यक्षपदी प्रसन्न हुलसुरकर,
    उपाध्यक्षपदी साहिल सदाफुले,
    सचिवपदी अथर्व क्षिरसागर,
    खजिनदारपदी कुणाल जोशी,
    तसेच समर्थ राजमाने यांची निवड करण्यात आली.
    यावेळी कार्यकारिणी सदस्य मयुर पचमिरे,अतुल पाटील,पवन वेदपाठक,गणेश पचमिरे,प्रसाद हुलसुरकर,संतोष घाडगे,केदार खराडे,ऋतुराज लोमटे,शिवम शेंडगे,वेदांत हुलसुरकर,आशिष शिंदे,आदित्य इंगळे,ऋषीकेश तिवारी,सागर शिंगणापूरे,अनुप तापडिया,यश गाटुळे,राहुल किरवे,अमित मोरे,श्रेयश कांबळे, संकेत पंडित,धनवीर झोंबाडे व गोपाळ शिंदे आदी उपस्थित होते.
    उत्सव अधिक आकर्षक, शिस्तबद्ध आणि यशस्वी करण्यासाठी सर्व सदस्यांनी सक्रिय सहभाग नोंदवण्याचा निर्धार व्यक्त केला.रामनवमी २०२६ उत्सव कळंबमध्ये भक्तिभाव आणि सामाजिक एकात्मतेचा संदेश देणारा ठरणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
error: Content is protected !!