August 10, 2025

कळंब येथे ज्येष्ठ नागरिक महासंघाच्या वतीने पालावर रक्षाबंधन

  • कळंब ( माधवसिंग राजपूत ) – भारतीय संस्कृतीत रक्षाबंधन हा सण भाऊ- बहीण यांच्यातील आपुलकी व स्नेहाचं नातं घट्ट करणारा सण आहे.यानिमित्ताने भाऊ आपल्या बहिणीसाठी संरक्षणाची जिम्मेदारी घेतो, स्नेहाच्या धाग्याचे बंधन असते. कळंब येथील ज्येष्ठ नागरिकांच्या वतीने कळंब शहराबाहेर असलेल्या रेणुका नर्सिंग स्कूलच्या समोरील भागात पाल टाकून राहणाऱ्या भटक्या लोकांच्या कुटुंबासोबत अनोखा असा रक्षाबंधन कार्यक्रम आयोजित केला व पालावरील या भटक्या समाजातील कुटुंबांना रक्षाबंधन सणाच्या आनंदात सहभागी करून घेतले,रोजी- रोटी साठी भटकंती करून आपले उदरनिर्वाह करणाऱ्या गावाच्या बाहेर पाल टाकून वस्ती करणाऱ्या भटक्या समाजातील चिमुकल्या मुलींना रक्षाबंधनां निमित्त नवीन कपडे वाटप करण्याचा कार्यक्रम घेण्यात आला.यानंतर मुलींनी राख्या बांधल्या कार्यक्रमाची सुरुवात संघर्ष घोडके या चिमुकल्या मुलाला राखी बांधून करण्यात आली,यानंतर ज्येष्ठ नागरिक व सामाजिक कार्यकर्त्यांना रक्षाबंधन करण्यात आले.आज देखील आपल्या रोजी- रोटी साठी भटकंती करत गावाच्या बाहेर पाल टाकून वस्ती करणारा समाज मोठ्या संख्येने आहे.या समाजाशी आपुलकी व स्नेहाचे नाते निर्माण व्हावे व ते अधिक घट्ट व्हावे यासाठीचा ज्येष्ठ नागरिक महासंघाचा हा उपक्रम प्रेरणादायी असा आहे, या कार्यक्रमाचे
    आयोजन ज्येष्ठ नागरिक महासंघाचे धाराशिव जिल्हाध्यक्ष महादेव महाराज आडसूळ यांनी केले होते.
    कार्यक्रमात ॲड.त्रिंबकराव मनगिरे,भाजपाचे शहराध्यक्ष मकरंद पाटील,प्रकाश भडंगे, परशुराम देशमाने,जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष सुरेश टेकाळे,मुख्याध्यापक राजेंद्र बिक्कड, प्रबुद्ध रंगभूमी बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष सुभाष घोडके,संदीप कोकाटे,सामाजिक कार्यकर्ते बंडूआबा ताटे यांनी सहभाग घेतला.माधवसिंग राजपूत यांनी सूत्रसंचालन केले.
error: Content is protected !!