तेर – एकात्मिक बालविकास सेवा योजना तेर प्रकल्पातील उपळा (मा) विभागातील पर्यवेक्षिका ज्योत्स्ना सोनवणे यांचा सेवानिवृत्ती निमित्त तेर येथे प्रभारी बालविकास प्रकल्प अधिकारी मनिषा पाटील,पर्यवेक्षिका वसुधा कुलकर्णी,पर्यवेक्षिका कल्पना मोहिते यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी मनिषा पाटील म्हणाल्या की,एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्पात नौकरी करणे हे आपले भाग्य आहे.आपण ज्ञानदानाचे कार्य करत आहोत. आपण संस्कारक्षम मुले घडविण्याचे काम करत आहोत, याचे फळ आपणांस चांगलेच मिळते.सेवा काळात महिलांनी नेहमी कार्यशील व आनंदी राहायला हवे. यावेळी गंगासागर मस्के,शितल गाढवे,सुनिता लोमटे,विजय गायकवाड यांनी मनोगत व्यक्त केले.सत्कारास उत्तर देताना सोनवणे म्हणाले की,सेवा काळात प्रत्येकाने नेमून दिलेले कार्य प्रामाणिकपणे पूर्ण करावे.आपली अंगणवाडी,आपला विभाग,सतत अग्रेसर कसा राहिल,यासाठी प्रयत्न केले पाहिजे.मी समाधानाने सेवानिवृत्त होत आहे. या कार्यक्रमास पथ्येवाड एस.बी., खेड,उपळा,तेर,येडशी,ढोकी,जागजी,कोंड येथील अंगणवाडी,मदतनीस,कार्यकर्ती उपस्थित होत्या.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन जोशिला लोमटे यांनी केले.
More Stories
धाराशिव प्रशालेत क्रांती दिन उत्साहात साजरा
धाराशिव शहरातील कचरा डेपो इतरत्र हलविण्याची शिवसेना (उ.बा.ठा) पक्षाची मागणी
पहिला आयुर्वेदिक हिमोफिलिया संशोधन प्रकल्प ‘रक्तामृत’चा धाराशिवमध्ये दिमाखदार शुभारंभ