August 8, 2025

डिकसळ गावात स्वच्छ भारत मिशनच्या निधीचा अपहार?

  • जिल्हाधिकाऱ्यांकडे राहुल वाघमारे यांची लेखी तक्रार
  • डिकसळ – तालुक्यातील डिकसळ येथील स्वच्छ भारत मिशन (टप्पा २) अंतर्गत आलेल्या सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनासाठीच्या लाखो रुपयांच्या निधीचा अपहार झाल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थ राहुल वाघमारे यांनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी दि.५ ऑगस्ट २०२५ रोजी जिल्हाधिकारी धाराशिव यांच्याकडे लेखी तक्रार सादर केली आहे.
    तक्रारीत नमूद करण्यात आले आहे की,या योजनेसाठी आलेल्या केंद्र शासनाच्या निधीचा उपयोग केवळ कागदोपत्रीच दाखविण्यात आला असून,प्रत्यक्षात गावात कोणतेही काम झालेले नाही.या संपूर्ण प्रक्रियेमध्ये ग्रामपंचायत, ग्रामसेवक,सरपंच,ठेकेदार आणि संबंधित अधिकाऱ्यांचे संगनमत असून त्यांनी निधी हडप केल्याचा संशय राहुल वाघमारे यांनी व्यक्त केला आहे.
    या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी,अशी मागणी त्यांनी केली आहे. यासोबतच तक्रारीची प्रत पंचायत समिती कळंब व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनाही देण्यात आली आहे.
    गावपातळीवरील भ्रष्टाचार उघडकीस आणण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचेही राहुल वाघमारे यांनी स्पष्ट केले आहे.
error: Content is protected !!