ज्ञान प्रसार विद्यालयात शैक्षणिक बैठकीत भविष्यकालीन योजना आणि धोरणांवर मंथन
मोहा – “सध्याच्या बदलत्या शैक्षणिक वातावरणात शिक्षकांची भूमिका अधिक जबाबदारीची झाली आहे.नवीन शैक्षणिक धोरणाच्या पार्श्वभूमीवर गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे,विद्यार्थी केंद्रित अध्यापन करणे आणि तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून शिक्षण प्रणाली सक्षम करणे,ही काळाची गरज आहे.शिक्षकांनी केवळ अध्यापनापुरते मर्यादित न राहता,विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सक्रिय सहभाग घ्यावा.”असे स्पष्ट प्रतिपादन सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांनी मार्गदर्शन करताना केले. ज्ञान प्रसारक मंडळ,येरमाळाच्या वतीने दि.५ ऑगस्ट २०२५ वार मंगळवार रोजी ज्ञान प्रसार माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,मोहा येथे एक महत्त्वपूर्ण शैक्षणिक बैठक संपन्न झाली.या बैठकीच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव डॉ.अशोकदादा मोहेकर होते. या बैठकीसाठी संस्थेचे ज्येष्ठ संचालक तात्यासाहेब पाटील, शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर मल्टीस्टेटचे चेअरमन हनुमंत (तात्या) मडके,संस्थेचे प्रशासकीय अधिकारी रमेश (भाऊ) मोहेकर, प्राचार्य अविनाश मोरे तसेच पर्यवेक्षक सतीश कानगुडे यांची प्रमुख उपस्थिती होती. बैठकीदरम्यान विद्यार्थी प्रवेश,नवीन शैक्षणिक धोरणांतर्गत झालेले बदल,शिक्षकांची बदललेली भूमिका आणि येणाऱ्या काळातील शैक्षणिक आव्हाने याविषयी डॉ.अशोक (दादा) मोहेकर यांनी सखोल मार्गदर्शन केले. त्यांच्या अभ्यासपूर्ण व प्रभावी विचारांनी उपस्थित शिक्षकांना प्रेरणा मिळाली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.शेखर गिरी यांनी केले,तर प्रा.नवनाथ करंजकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.यावेळी उच्च माध्यमिक विभागाचे प्रा.सुनील साबळे,सहशिक्षक डी.बी.मडके, कमलाकर शेवाळे यांच्यासह सर्व शिक्षक,शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ही बैठक आगामी शैक्षणिक वर्षासाठी दिशादर्शक ठरणार असून संस्थेच्या प्रगतीचा पुढील टप्पा आखण्यात उपयुक्त ठरली.
More Stories
शिक्षण महर्षी कै.ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना ज्ञान प्रसारच्या वतीने अभिवादन
ज्ञान प्रसार विद्यालयात उत्साहात शिक्षक-पालक सभा संपन्न
ज्ञान प्रसार विद्यालयात डॉ.अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांना अभिवादन