मोहा – आपल्या शाहिरी आणि लेखणीने जनसामान्यांच्या व्यथा संपूर्ण भारतातच नव्हे तर जगभर पोहोचवणारे लोकशाहीर डॉ.अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त तसेच लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. मुख्याध्यापक तथा प्राचार्य अविनाश मोरे यांच्या हस्ते साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या तसेच लोकमान्य टिळकांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.याप्रसंगी संस्थेचे प्रशासकीय अधिकारी रमेश (भाऊ) मोहेकर,संस्थेचे ज्येष्ठ संचालक तात्यासाहेब पाटील, पर्यवेक्षक डी.बी.मडके,सहशिक्षक कमलाकर शेवाळे तसेच उच्च माध्यमिक विभागाचे प्रा.सुनील साबळे यांची प्रमुख उपस्थिती होती.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. देवदत्त पाटील यांनी केले. याप्रसंगी प्रीती गव्हाणे,प्रतिक्षा जाधव,आशिया पठाण,जीनत शेख,प्रियंका जाधव,समाधान देटे, ओमसिंह गरुड,कु.अंकिता मते, अंकिता लोकरे ,जोया शेख, राजश्री भोरे या विद्यार्थीनींनी डॉ.अण्णाभाऊ साठे तसेच लोकमान्य टिळक यांच्या जीवन चरित्रावर आपल्या मनोगतातून प्रकाश टाकला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.नवनाथ करंजकर यांनी केले तर उपस्थितांचे आभार सहशिक्षक ज्योतीराम सोनके यांनी मानले.याप्रसंगी सर्व शिक्षक,शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.
More Stories
शिक्षण महर्षी कै.ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना ज्ञान प्रसारच्या वतीने अभिवादन
बदलत्या शैक्षणिक युगात शिक्षकांची भूमिका व्यापक झाली – डॉ.अशोकराव मोहेकर
ज्ञान प्रसार विद्यालयात उत्साहात शिक्षक-पालक सभा संपन्न