मोहा – ज्ञान प्रसारक मंडळाचे सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने प्राचार्य अविनाश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ज्ञान प्रसार विद्यालयात नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी दि.२ ऑगस्ट २०२५ रोजी शिक्षक-पालक सभेचे आयोजन करण्यात आले.या सभेच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक तथा प्राचार्य अविनाश मोरे हे होते. कार्यक्रमास संस्थेचे प्रशासकीय अधिकारी रमेश (भाऊ) मोहेकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. सभेचे प्रास्ताविक सहशिक्षक सूर्यकांत गुंगे यांनी केले.यानंतर प्राचार्य अविनाश मोरे यांनी पालकांशी संवाद साधत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळा कटिबद्ध असल्याचे सांगितले.यावेळी पालकांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करत काही शंकाही मांडल्या,ज्यांचे समाधान प्राचार्य सरांनी अत्यंत संयमाने व समाधानकारक उत्तर देत केले.
या प्रसंगी नववी व दहावीच्या वर्गाला अध्यापन करणारे सर्व सहशिक्षक संजय आडणे,अशोक राऊत,जनार्दन भामरे,शैलेश गुरव,सूर्यकांत गुंगे,मंगलदास पवार,सतीश मडके व सौ.नीता सोनवणे हे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी आभार प्रदर्शनही सूर्यकांत गुंगे यांनी केले.
More Stories
शिक्षण महर्षी कै.ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना ज्ञान प्रसारच्या वतीने अभिवादन
बदलत्या शैक्षणिक युगात शिक्षकांची भूमिका व्यापक झाली – डॉ.अशोकराव मोहेकर
ज्ञान प्रसार विद्यालयात डॉ.अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांना अभिवादन