August 8, 2025

धाराशिव जिल्हा पोलिसनामा

  • धाराशिव शहर वाहतुक शाखा व संबंधीत पोलीस ठाण्यांनी महत्त्वाच्या रस्त्यांवर दि.02 ऑगस्ट रोजी मोटार वाहन कायदा-नियम भंग प्रकरणी एकुण 331 कारवाया करुन 2,61,650 ₹ ‘तडजोड शुल्क’वसुल केले आहे.
  • “ अवैध मद्य विरोधी कारवाई.”
  • उमरगा पोलीस ठाणे: आरोपी नामे-वसंत गोपा राठोड, वय 56 वर्षे, रा.सेवानगर तांडा कदेर ता. उमरगा जि. धाराशिव हे दि.02.08.2025 रोजी 17.30 वा. सु सेवानगर तांडा कदेर येथे अंदाजे 6,500 ₹ किंमतीची 65 लिटर गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. आरोपी नामे-शिवाजी चंदु राठोड, रा. सेवानगर तांडा ता. उमरगा जि. धाराशिव हे दि.02.08.2025 रोजी 17.55 वा. सु आपल्या घरासमोर अंदाजे 7,000₹ किंमतीची 70 लिटर गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई) अन्वये उमरगा पो ठाणे येथे स्वतंत्र 2 गुन्हे नोंदविले आहेत.
  • “रहदारीस धोकादायरीत्या वाहन उभे करणाऱ्यांवर गुन्हे नोंद.”
    तुळजापूर पोलीस ठाणे:आरोपी नामे-अभिजीत राहुल पाटील, वय 21 वर्षे, रा. ढेकरी ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि.02.08.2025 रोजी 19.40 वा. सु. आपल्या ताब्यातील ऑटो रिक्षा क्र एमएच 25 एके 0846 हा जुने रेस्ट हाउसचे गेटसमोर तुळजापूर येथे सार्वजनिक रोडवर रहदारीस धोकादायकरीत्या उभे केलेले असताना तुळजापूर पोलीसांना मिळून आले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द भारतीय न्याय सहिंता कलम 285 मोवाका अन्वये तुळजापूर पो.ठा. येथे गुन्हा नोंदवला आहे.
  • “ मालमत्तेविरुध्द गुन्हे.”
  • परंडा पोलीस ठाणे :फिर्यादी नामे-सुदाम तुकाराम कदम, वय 80 वर्षे, रा. चिंचपुर खु ता. परंडा जि. धाराशिव यांनी स्टेट बॅक ऑफ इंडीया मधुन रोख रक्कम 70,000₹ काढून जवळ असलेल्या गमज्यामध्ये गुंडाळून प्रवासी बॅगेत ठेवून दि.02.08.2025 रोजी 11.00 वा. सु.मिलन हॉटेल परंडा समोरुन जात असताना अज्ञात व्यक्तीने बॅग कापून चोरुन नेले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-सुदाम कदम यांनी दि.02.08.2025रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन परंडा पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 303 (2)अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • वाशी पोलीस ठाणे :फिर्यादी नामे-दामोदर राजाराम कवडे, वय 66 वर्षे, रा.कवडेवाडी ता. वाशी जि. धाराशिव यांचे कवडेवाडी शिवारातील लक्ष्मी गोल्ड कंपनीची 5 एच पी ची मोटर, रामहरी किसन विधाते यांची 5 एच पी ची फलोस्टच कंपनीची मोटर, स्पॅन सोलर कंपनीचा 3 एच पी ची मोटर, रामलिंग भानुदास कवडे, यांची 5 एच पी ची ॲनसन कंपनीची मोटार, एव्हीआय सोलर कंपनीच्या 3 एच पी ची मोटर असा एकुण 53,000₹ किंमतीचा माल हा दि.30.07.2025 ते दि. 31.07.2025 रोजी 16.00 वा. सु. अज्ञात व्यक्तीने चोरुन नेला.अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- दामोदर कवडे यांनी दि.02.08.2025रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन वाशी पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 303(2) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • उमरगा पोलीस ठाणे :फिर्यादी नामे-खय्युम रज्जाक बागवान, वय 32 वर्षे, रा. खजुरी ता. आळंद जि. गुलबर्गा यांची होंडा सि.डी. 110 ड्रिम बीएस 3मोटरसायकल क्र केए 32 ईएच 3526 अंदाजे 20,000₹ किंमतीची ही दि.30.06.2025 रोजी 11.30 ते 12.30 वा. सु. बस्थानक उमरगा येथुन अज्ञात व्यक्तीने बॅग कापून चोरुन नेली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-खय्युम बागवान यांनी दि.02.08.2025रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन उमरगा पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 303 (2)अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • “आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यावर गुन्हा दाखल.”
  • येरमाळा पोलीस ठाणे:मयत नामे-शिला राजेंद्र वाघमारे, वय 33 वर्षे, रा.तेरखेडा ता. वाशी जि. धाराशिव यांनी दि.30.07.2025 रोजी 12.30 वा.सु. तेरखेडा शिवारातील आरोपीचे शेतातील विहीरीतील पाण्यात उडी मारुन आत्महत्या केली. आरोपी नामे-राजेंद्र कल्याण वाघमारे, रा. तेरखेडा ता. वाशी जि. धाराशिव यांनी मागील सहा महिण्यापासुन घराचे बांधकाम करण्यासाठी माहेरहुन पैसे घेवून ये या कारणावरुन मयत शिला हिस शारीरीक व मानसिक त्रास दिल्याने त्याचे त्रासास कंटाळुन मयत शिला यांनी आत्महत्या केली आहे. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-रवि आनंद कुसंगवाड, वय 29 वर्षे, रा. सरस्वती मंदीर खरपोडी रोड जालना ता.जि. जालना यांनी दि.02.08.2025 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.न्या.सं.कलम- 108, 80, 85 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • “मारहाण.”
    उमरगा पोलीस ठाणे :आरोपी नामे-विजय कोंडीबा शेळके, रा. नारंगवाडी ता. उमरगा, मुक्ताजी भोसले, सदानंद साठे, अमोल साठे, दयानंद साठे, चौघे रा. मातोळा ता. औसा जि. लातुर जि. धाराशिव यांनी दि.01.08.2025 रोजी 21.00वा. सु.संध्या बारचे ससमोर नारंगवाडी येथे फिर्यादी नामे-अभिमन्यु उर्फ पिंटु रामराव जाधव, वय 48 वर्षे, रा.नारंगवाडी पश्चिम ता. उमरगा जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी आर्थिक व्यवहाराचे कारणावरुन गैरकायद्याची मंडळी जमवून शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी,लोखंडी रॉडने मारहाण करुन जखमी केले. जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-अभिमन्यु जाधव यांनी दि.02.08.2025रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन पो ठाणे उमरगा येथे भा.न्या.सं.कलम 118(1),115(2), 352, 351(2), (3) 189(2), 191(2),191(3), 190 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • उमरगा पोलीस ठाणे :आरोपी नामे-अभिमन्यु रामराव जाधव, कृष्णा जाधव, सुधीर प्रभाकर जाधव, सागर दगडु जाधव, सदाशिव आष्ठे, सर्व रा. नारंगवाडी ता. उमरगा, जि. धाराशिव यांनी दि.01.08.2025 रोजी 21.00वा. सु.नारंगवाडी शिवार संध्या बारचे ससमोर नारंगवाडी येथे फिर्यादी नामे-विजय कोंडीबा शेळके, वय 41 वर्षे, रा.नारंगवाडी ता. उमरगा जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी आर्थिक व्यवहाराचे कारणावरुन गैरकायद्याची मंडळी जमवून शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी,काठी व दगडाने मारहाण करुन जखमी केले. जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-विजय शेळके यांनी दि.02.08.2025रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन पो ठाणे उमरगा येथे भा.न्या.सं.कलम 118(1),115(2), 352, 351(2), (3) 189(2), 191(2),191(3), 190 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • वाशी पोलीस ठाणे :आरोपी नामे-बप्पासाहेब भागवत जाधवर, संदीपान भागवत जाधवर, विलास भागवत जाधवर, धनु विलास जाधवर, प्रभावती बप्पासाहेब जाधवर, प्रकाश संदीपान जाधवर, शोभा प्रकाश जाधवर, प्रयागाबाई विलास जाधवर, संतोष त्रिंबक जाधवर, त्रिंबक भागवत जाधवर, सुभाबाई संदीपान जाधवर सर्व रा. ईसरुप ता. वाशी जि. धाराशिव यांनी दि.14.07.2025 रोजी 07.30वा. सु.ईसरुप येथे फिर्यादी नामे-दत्तात्रय भास्कर जाधवर, वय 51 वर्षे, रा. ईसरुप ता. वाशी जि. धाराशिव यांना व त्यांची पत्नी सुरेखा, मुलगा कृष्णा मुलगी शिवकन्या यांना नमुद आरोपींनी शेतीच्या वादाचे कारणावरुन गैरकायद्याची मंडळी जमवून शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी,काठी व दगडाने मारहाण करुन जखमी केले.जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-दत्तात्रय जाधवर यांनी दि.02.08.2025रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन पो ठाणे वाशी येथे भा.न्या.सं.कलम 118(1),115(2),351(2), (3) 189(2), 191(2),191(3), 190 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • “फसवणुक.”
  • आनंदनगर पोलीस ठाणे :आरोपी नामे-सुकमनी कंपनीचे चेअरमन राजेंद्र सोपान जाधव रा. हातमोली ता. तासगाव जि. सांगली, फाउंडर लिडर मयुर कुदळे, शितल कुदळे, महादेव कुदळे, सर्व रा. सारोळा ता. जि. धाराशिव ह.मु. कोर्ट गल्ली सांजा रोड धाराशिव यांनी दि.25.03.2020 रोजी 12.00 वा. सु.कोर्ट कॉलनी सांजा रोड धाराशिव येथे फिर्यादी नामे-सुरेखा महेश लोहार, वय 39 वर्षे, रा.कोर्ट कॉलनी सांजा रोड धाराशिव ता. जि. धाराशिव यांची व इतर 34 इसमांची आरोपीने 50 हजार रुपयाला 15 महिन्यामध्ये 70 हजार परतावा देतो असे अमिष दाखवून विश्वास संपादन करुन फिर्यादी व इतर 34 इसमांची एक कोटी सहा लाख सत्तावन्न हजार रुपये ची फसवणुक केली आहे. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- सुरेखा लोहार यांनी दि.02.08.2025रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन पो ठाणे आनंदनगर येथे भा.न्या.सं.कलम 316(2), 318(4), 3(5) सह 3, 4 महाराष्ट्र ठेवीदाराचे संरक्षण अधिनियम अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • जनसंपर्क विभाग धाराशिव पोलीस
error: Content is protected !!