August 8, 2025

कॅनव्हास स्कूलमध्ये लोकशाहीर डॉ.अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांना अभिवादन

  • कळंब — येथील ‘कॅनव्हास इंटरनॅशनल स्मार्ट स्कूल’ तांदुळवाडी रोड,कळंब येथे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती.या दोन्ही ऐतिहासिक दिनांचे औचित्य साधून अध्यक्ष रवि नरहिरे व शाळेच्या संचालिका सौ.आशा नरहिरे यांच्या प्रेरणेने विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी राष्ट्रभक्ती व सामाजिक समता याचे संदेश देणारे विविध सांस्कृतिक व शैक्षणिक कार्यक्रम सादर केले.
    कार्यक्रमाची सुरुवात दिपप्रज्वलन आणि प्रतिमापूजनाने करण्यात आली. शाळेचे उपप्राचार्य पवन कुलकर्णी यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. प्रमुख भाषणात त्यांनी लोकमान्य टिळकांचे स्वराज्य आणि सामाजिक कार्याविषयीचे योगदान आणि अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यिक कार्यातून उमटलेली सामाजिक जाणीव यावर सखोल प्रकाश टाकला.
    शाळेतील विद्यार्थ्यांनी भाषणे, घोषवाक्य,गीतगायन अशा विविध माध्यमांतून लोकमान्य टिळक आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे या महापुरूषांचे कार्य उलगडून दाखवले. विशेषतः कार्यक्रमामध्ये सर्व शिक्षक वृंद व विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घेऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली.
    कार्यक्रमाचे आयोजन सांस्कृतिक विभागप्रमुख प्रशांत भोले व सौ. अर्चना बावीकर आणि त्यांच्या सांस्कृतिक विभागातील सहकारी शिक्षकांनी केले होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.दिपाली गायकवाड यांनी केले.संगीत विभाग प्रमुख प्रशांत धावारे व विशाल धावारे यांनी “माझी मैना गावाकडे राहिली” हे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी लिहिलेला जगप्रसिद्ध लोकनाट्यात्मक पोवाडा उत्स्फूर्तपणे सादर केला.
    अमोल सांजेकर व बाबासाहेब जाधव या शिक्षकांनी लोकमान्य टिळक व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवन कार्याविषयी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन व समारोप सौ.मीना शिंदे यांनी केला. सांस्कृतिक विभागातील सर्व शिक्षक सहकाऱ्यांच्या मदतीने हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला.
error: Content is protected !!