धाराशिव (जिमाका) – महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागामार्फत निर्गमित शासन निर्णय क्रमांक संकीर्ण-२०२५/प्र.क्र.१६२/आस्था-०१ (ई-१), दिनांक २९ जुलै २०२५ अन्वये राज्यभरात १ ऑगस्टपासून ७ ऑगस्ट २०२५ पर्यंत “महसूल सप्ताह” साजरा करण्यात येत आहे.या पार्श्वभूमीवर धाराशिव जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी व तहसील कार्यालयांमार्फत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सप्ताहाची सुरुवात १ ऑगस्ट रोजी “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान” प्रत्येक मंडळात राबवून झाली.त्यानंतर २ ऑगस्ट रोजी २०११ पूर्वी शासकीय जमिनीवर अतिक्रमण करून वास्तव्यास असलेल्या कुटुंबांपैकी पात्र लाभार्थ्यांना पट्टे वाटपाचा कार्यक्रम पार पडला.३ ऑगस्ट रोजी पाणंद व शिवरस्त्यांची मोजणी करून त्यांच्या दुतर्फा झाडे लावण्याचे अभियान राबवले गेले.४ ऑगस्ट रोजी “महसूल दिन” साजरा करण्यात येणार आहे.या दिवशी महसूल संवर्गातील कार्यरत व सेवानिवृत्त अधिकारी-कर्मचाऱ्यांशी संवाद साधून उत्कृष्ट अधिकारी/कर्मचारी पुरस्कारांचे वितरण,तसेच मान्यवरांच्या हस्ते विविध योजनांच्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्रे वितरीत करण्यात येणार आहे.५ ऑगस्ट रोजी विशेष सहाय्य योजनेतील डीबीटी न झालेल्या लाभार्थ्यांच्या घरी जाऊन अनुदान वितरणाची मोहिम,६ ऑगस्टला शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे हटवणे व शर्तभंग प्रकरणांवर निर्णय घेणे हे उपक्रम राबवले जातील.सप्ताहाचा समारोप ७ ऑगस्ट रोजी “M-Sand” धोरणाच्या अंमलबजावणीसह नवी कार्यप्रणाली (SOP) अमलात आणून महसूल सप्ताहाचा सांगता समारंभ आयोजित करण्यात येणार आहे.
More Stories
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते चॅटबोटचे उद्घाटन
आंतरराष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी जिल्हास्तरीय निवड चाचणी ११ ऑगस्टला