August 8, 2025

रस्त्यांच्या दयनीय अवस्थे बाबत नगर परिषदेस अभाविपचे निवेदन

  • धाराशिव – अखिल भारतीय विद्यार्थी परिषद,धाराशिव शाखेच्या वतीने शहरातील रस्ता दुरुस्ती व ट्राफिक सिग्नल चालु करण्यासाठी नगर परिषदेस निवेदन देण्यात आले.यात प्रामुख्याने छत्रपती शिवाजी महाराज स्मारक ते राजमाता जिजाऊ चौक व उंबरे कोठा तसेच भवानी चौक या रस्त्याचा वापर शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थी सायकल व दुचाकीवरून करत असतात. त्या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात असलेल्या खड्ड्यामुळे विद्यार्थी जात असताना त्यांना तारेवरची कसरत करावी लागते, तसेच शहरातील मुख्य रस्त्यावर पावसाचे पाणी जाण्यासाठी व्यवस्था नसल्या कारणामुळे रस्ते एखाद्या तलावासारखे दिसत आहे. त्यावर उपाययोजना करण्यात याव्यात. रामकृष्ण परमहंस महाविद्यालयाच्या समोरील नालीची दुरावस्था झालेली असल्यामुळे रस्त्यावर पाणी साठा होत आहे.शहरातील कुठलेच ट्राफिक सिग्नल अद्याप सुरू केलेले नाहीत.ते लवकरात लवकर सुरू करण्यात यावे.तरी रस्ता दुरुस्ती व ट्राफिक सिग्नल या समस्या येत्या १० दिवसात सोडविण्यात याव्यात.अशा मागण्या करण्यात आल्या.अन्यथा विद्यार्थ्यांच्या तीव्र रोषाला सामोरे जावे लागेल.हा इशारा देखील देण्यात आला.यावेळी शहर मंञी कु. साक्षी पाटील,सहमंञी जयराम गंभिरे,अक्षय माळी,दिपक चव्हाण,कृष्णाली राऊत,वसुधा गायकवाड आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
error: Content is protected !!