August 8, 2025

आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त धाराशिव येथे “रेड रन” मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन

  • धाराशिव (जिमाका) – आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय,जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभागाच्या वतीने आज “एचआयव्ही/एड्स जनजागृतीसाठी रेड रन मॅरेथॉन स्पर्धा” आयोजित करण्यात आली. या स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.धनंजय चाकुरकर यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून करण्यात आले.
    कार्यक्रम प्रसंगी प्रशासकीय अधिकारी अतुल जगताप,जिल्हा कार्यक्रम अधिकारी उद्धव कदम, वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ.निता पौळ,जिल्हा पर्यवेक्षक महादेव शिनगारे आदी अधिकारी उपस्थित होते.
    यावेळी डॉ.चाकुरकर यांनी उपस्थित युवकांना एड्स जनजागृती व सामाजिक जबाबदारीबाबत मार्गदर्शन केले. त्यांनी युवांमध्ये एड्स प्रतिबंधाबाबत जागरूकता निर्माण करण्याची गरज अधोरेखित केली.
    आर.पी.कॉलेज,के.टी.पाटील फार्मसी कॉलेज,छत्रपती शिवाजी कनिष्ठ महाविद्यालय,व्यंकटेश महाजन महाविद्यालय,सहकार महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालय (कळंब), एस.एम.विद्यालय (बेंबळी), कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालय (वाशी),व्होकेशनल कॉलेज (धाराशिव) आदी संस्थांतील युवक-युवतींनी सहभाग घेतला.
    मॅरेथॉनचा मार्ग हातलादेवी मंदिर ते घाटग्री रोड असा होता.एकूण ६१ स्पर्धकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.या स्पर्धेत पुरुष गटात: प्रथम क्रमांक विराज विजयकुमार जाधवर (व्यंकटेश महाजन महाविद्यालय),द्वितीय प्रवीण युवराज जाधव (छत्रपती शिवाजी कनिष्ठ महाविद्यालय),तृतीय करण खंडू बिक्कड (आर.पी. कॉलेज),महिला गटात: प्रथम रेणुका कुलकर्णी (कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालय,वाशी),द्वितीय – वैभवी हाऊळ (के.टी. पाटील फार्मसी कॉलेज), तृतीय – आरती कांबळे (कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालय,वाशी) विजेत्यांना बक्षिसे,प्रमाणपत्रे आणि मेडल्स देऊन गौरविण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक उद्धव कदम यांनी केले,तर सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन महादेव शिनगारे यांनी केले.या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डापकू, ICTC, ART, STI, तसेच १०८ अम्बुलन्सचे जिल्हा समन्वयक यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
error: Content is protected !!