August 8, 2025

फ्रेंड्स फॉरएव्हर फाउंडेशनचा अभिनव शैक्षणिक उपक्रम

  • विद्यार्थी शिक्षक व पालकांसाठी तज्ञांची कार्यशाळा
    कळंब – सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असणाऱ्या कळंब येथील वर्गमित्रांच्या ‘फ्रेंड्स फॉरएव्हर फाउंडेशन’ने सामाजिक बांधिलकीतून एक अभिनव शैक्षणिक उपक्रम हाती घेतला आहे.याआधी संस्थेने फेब्रुवारी महिन्यात ‘कृषिमित्र’ या नावाने भव्य कृषी प्रदर्शनाचे आयोजन करून शेतकऱ्यांचे प्रश्न आणि उपाय केंद्रस्थानी आणले होते. सामाजिक सलोखा वाढावा,शेती व शिक्षण यांची सांगड घालावी, यासाठी विविध उपक्रम राबवले जातात.
    आता ‘फ्रेंड्स फॉरएव्हर फाउंडेशन’ने नवोदय व इतर स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ‘विद्यार्थी मित्र’ या नावाने ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक उपक्रम सुरू केला आहे.
    या उपक्रमाचा शुभारंभ रविवार, दिनांक ३ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी १० वाजता,जय भवानी फंक्शन हॉल,परळी रोड,कळंब येथे होणार आहे.
    या कार्यशाळेत नवोदय, स्कॉलरशिप,NMMS यांसारख्या महत्त्वाच्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन दिले जाणार आहे.यासाठी मार्गदर्शक म्हणून जिल्ह्यात नवोदय पॅटर्न तयार करणारे शिलेदार –
    जगन्नाथ धायगुडे,बाळासाहेब जमाले,अनिल शिरसागर,शहाजी पुरी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
    या उपक्रमात खालील बाबींचा समावेश करण्यात आलेला आहे:
    तज्ञ शिक्षकांचे मार्गदर्शन,महिन्यातून दर रविवारी दोन सराव परीक्षा महिन्याला एकूण ८ सराव चाचण्या,
    परीक्षेनंतर मूल्यमापन,गरजू विद्यार्थ्यांसाठी मोफत पुस्तके,
    टॉपर्सना दरमहा सन्मानचिन्ह व बक्षिसे,विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास,पालक-शिक्षक यांचा सहभाग, आणि ग्रामीण शिक्षण व्यवस्था बळकट करणे,हे या उपक्रमामागचे प्रमुख उद्दिष्ट आहे.
    या कार्यशाळेत पालक,विद्यार्थी व शिक्षक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे,असे आवाहन फ्रेंड्स फॉरएव्हर फाउंडेशन, कळंब यांच्यावतीने करण्यात आले आहे.
error: Content is protected !!